टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आता सापडलं आहे. मुलाच्या जन्मानंतर १५ दिवसांनी रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी आपल्या मुलाचे नाव चाहत्यांसाठी जाहीर केले आहे.
रोहितची पत्नी रितिका हिने स्वत: तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा १५ नोव्हेंबरला दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला. याची माहिती खुद्द कर्णधार रोहित शर्माने दिली होती. एका दिवसानंतर त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले होते की, आमचे कुटुंब आता ४ जणांचे झाले आहे'.
रोहित आणि रितिकाला एक मुलगी आहे, तिचे नाव समायरा आहे. समायराचा जन्म २०१८ मध्ये ३० डिसेंबर रोजी झाला होता. तर रोहित आणि रितिका यांचे २०१५ मध्ये लग्न झाले होते.
अहान हे नाव संस्कृत शब्द 'अहा' पासून आले आहे. याचा अर्थ 'जागृत करणे' असा होतो. आहान नावाचा अर्थ आहे, नवी पहाट, सूर्योदय, प्रकाशाचा पहिला किरण, मॉर्निंग ग्लोरी इ. या नावाची व्यक्ती नेहमी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करते.
अहानच्या जन्मामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीचा भाग होऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले.
टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला. यजमानांनी पहिली कसोटी २९५ धावांच्या मोठ्या फरकाने गमावली.
संबंधित बातम्या