IND vs NZ : रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार? हे दोन फलंदाज आणि एक गोलंदाज शर्यतीत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ : रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार? हे दोन फलंदाज आणि एक गोलंदाज शर्यतीत

IND vs NZ : रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार? हे दोन फलंदाज आणि एक गोलंदाज शर्यतीत

Nov 03, 2024 08:41 PM IST

Indian Cricket Team Test Captain : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

IND vs NZ : रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार? हे दोन फलंदाज आणि एक गोलंदाज शर्यतीत
IND vs NZ : रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार? हे दोन फलंदाज आणि एक गोलंदाज शर्यतीत (HT_PRINT)

न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला. न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. याआधी २०१२ मध्ये इंग्लंडने भारताला हरवले होते. भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, रोहित शर्मा याला कसोटीच्या कर्णधारपदावरून काढून टाकावे. पण रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावण्याची हीच योग्य वेळ आहे का? जर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले तर कोणता खेळाडू या पदासाठी योग्य आहे.

या खेळाडूंना मिळू शकते कर्णधारपद...

आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, पण या मालिकेनंतर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदात बदल शक्य आहे का? आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले तर दावेदार कोण?

रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद ऋषभ पंत, केएल राहुल किंवा जसप्रीत बुमराह यांच्याकडे दिले जाऊ शकते. या खेळाडूंचे दावे जोरदार आहेत, पण कोणत्या खेळाडूला कर्णधारपद मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ऋषभ पंत, केएल राहुल किंवा जसप्रीत बुमराह यांनी यापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. अलीकडेच टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटला अलविदा केला. यानंतर सूर्यकुमार यादव याला भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद मिळाले. तसेच, आता रोहित शर्मा लवकरच भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडू शकतो, असे मानले जात आहे.

तसेच, भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय निर्णय घेऊ शकते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्माच्या जागी नव्या कर्णधाराचे नाव निश्चित होऊ शकते.

Whats_app_banner