IND vs BAN : सूर्यकुमार यादव की शिवम दुबे? रोहित शर्माचा टी-20 मधील हा खास विक्रम कोण मोडणार? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : सूर्यकुमार यादव की शिवम दुबे? रोहित शर्माचा टी-20 मधील हा खास विक्रम कोण मोडणार? पाहा

IND vs BAN : सूर्यकुमार यादव की शिवम दुबे? रोहित शर्माचा टी-20 मधील हा खास विक्रम कोण मोडणार? पाहा

Oct 04, 2024 12:38 PM IST

टी-20 मालिकेत भारत आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माचा मोठा विक्रम सूर्यकुमार आणि शिवम दुबे यांच्या निशाण्यावर असेल.

IND vs BAN : सूर्यकुमार यादव की शिवम दुबे? रोहित शर्माचा टी-20 मधील हा खास विक्रम कोण मोडणार? पाहा
IND vs BAN : सूर्यकुमार यादव की शिवम दुबे? रोहित शर्माचा टी-20 मधील हा खास विक्रम कोण मोडणार? पाहा

बांगलादेशचा कसोटी मालिकेत २-० असा धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया आता ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ६ ऑक्टोबरपासून ग्वाल्हेर येथे टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 

यानंतर दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल आणि त्यानंतर हैदराबादमध्ये तिसऱ्या सामन्याने मालिकेचा समारोप होईल.

या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा आधीच करण्यात आली आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संपूर्ण भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेत धमाका करण्यास सज्ज आहे.

पण सर्वांच्या नजरा विशेषत: कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या फलंदाजीवर असतील.

वास्तविक, सूर्या आणि शिवम गेल्या काही काळापासून T20 क्रिकेटमध्ये जोरदार आक्रमण करत आहेत आणि यावर्षी ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. आगामी मालिकेतही या दोन्ही फलंदाजांची फलंदाजी अशीच सुरू राहिल्यास दोघांना रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.

सूर्याला मोठी संधी 

टी-20 क्रमवारीत नंबर दोन फलंदाज असलेल्या सूर्याने यावर्षी ११ टी-20 सामन्यांमध्ये १५० च्या स्ट्राइक रेटने २९१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने ३ अर्धशतके झळकावली आहेत. जर सूर्याने पुढील ३ सामन्यात ८८ धावा केल्या तर तो रोहित शर्माला मागे टाकत यावर्षी सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.

T20I विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर रोहितने क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाचा निरोप घेतला आहे. अशा परिस्थितीत सूर्याकडे रोहितला मागे सोडण्याची मोठी संधी आहे.

शिवम दुबे यालाही सुवर्णसंधी 

रोहितच्या नावावर यावर्षी ११ टी20 सामन्यात ३७८ धावा आहेत. सूर्यासोबतच शिवम दुबेलाही रोहितला मागे टाकण्याची मोठी संधी आहे. शिवमने यावर्षी १५ सामन्यांच्या १३ डावात २९६ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत शिवम दुबेला रोहित शर्माला मागे टाकण्यासाठी फक्त ८३ धावांची गरज आहे. अशा स्थितीत सूर्या आणि शिवम पैकी कोण रोहितला मागे टाकतो हे पाहावं लागेल.

यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

रोहित शर्मा- ३७८ 

शिवम दुबे- २९६ 

यशस्वी जैस्वाल- २९३ 

सूर्यकुमार यादव - २९१ 

शुभमन गिल- २६६

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर) ), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

टी-20 मालिकेसाठी बांगलादेशी संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमोन, तौहीद हृदयॉय, महमूद उल्लाह, लिटन दास, जाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तकीन रहमान, मुस्तकीन अहमद , शोरीफुल इस्लाम , तंजीम हसन साकीब , रकीबुल हसन.

Whats_app_banner