भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने शतक झळकावले आहे.
रोहितने टीम इंडियासाठी दमदार फलंदाजी करत कारकिर्दीतील ३२ वे शतक झळकावले. रोहितच्या या खेळीत १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.
हे वृत्त लिहेपर्यंत त्याने ८० चेंडूंचा सामना करत ११० धावा केल्या होत्या. रोहितने षटकारांचा पाऊस पाडला. त्याने षटकार ठोकतच आपले शतक पूर्ण केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य दिले होते. त्याला टीम इंडियाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रोहितने २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जलद वनडे शतक झळकावले होते. त्याने दिल्लीत ६३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. आता त्याने कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध ७६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रोहितचे तिसरे वेगवान शतकही इंग्लंडविरुद्धच आहे. त्याने २०१८ मध्ये ८२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३८ दिवसांनंतर आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७५ दिवसांनंतर शतक झळकावले आहे.
रोहितने आपल्या वनडे कारकिर्दीतील यापूर्वीचे शतक अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत झळकावले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना ऑक्टोबर २०२३ मध्ये झाला होता. रोहितने स्फोटक फलंदाजी करत ८४ चेंडूंचा सामना करत १३१ धावा केल्या. रोहितने १६ चौकार आणि ५ षटकार मारले होते.
इंग्लंडच्या ३०५ धावांचा पाठलाग करताना रोहितसोबत शुभमन गिलचीही महत्त्वाची भूमिका होती. या दोघांमध्ये कटकमध्ये १३६ धावांची भागीदारी झाली होती. शुभमनने ५२ चेंडूंचा सामना करत ६० धावा केल्या. शुभमनच्या या खेळीत ९ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. मात्र यानंतर तो बाद झाला.
६३ चेंडू अफगाणिस्तानविरुद्ध, दिल्ली २०२३
७६ चेंडू इंग्लंडविरुद्ध, कटक २०२५
८२ चेंडू इंग्लंडविरुद्ध, नॉटिंगहॅम २०१८
८२ चेंडू न्यूझीलंडविरुद्ध, इंदूर २०२३
८४ चेंडू वेस्ट इंडिजविरुद्ध , गुवाहाटी २०१८
संबंधित बातम्या