Hardik Pandya IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ पूर्णपणे नवीन रुपात दिसणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपला नवा कर्णधार बनवले आहे. सोशल मीडियावर हा खूप चर्चेचा विषय ठरला आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवले होते, पण आयपीएल २०२४ पूर्वी मुंबईने त्याला गुजरात टायटन्समधून आणले आणि कर्णधार बनवले. हार्दिक २०१५ ते २०२२ पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता.
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि मुंबई इंडियन्ससोबत अनेक वर्षे घालवलेल्या पार्थिव पटेलने एक मोठा दावा केला आहे. त्याने सांगितले की मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना रीलीज करणार होते, पण रोहित शर्माच्या मागणीवरून या दोघांनाही संघात ठेवण्यात आले.
पार्थिव पटेल जिओ सिनेमावर बोलताना म्हणाला, की 'रोहित नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा असतो आणि याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे आहेत. २०१४ मध्ये बुमराह पहिल्यांदा मुंबईत आला, पण २०१५ मध्ये त्याचा पहिला हंगाम चांगला गेला नाही. असे वाटत होते की मोसमाच्या मधातच त्याला रीलीज केले जाईल, परंतु रोहितला वाटले की हा खेळाडू भविष्यात चांगली कामगिरी करू शकतो. यानंतर २०१६ पासून बुमराहची कामगिरी आपण पाहतच आहात.
हार्दिक पांड्याबाबत पार्थिव पटेल म्हणाला, 'हार्दिक पांड्यासोबतही असेच घडले. तो २०१५ मध्ये मुंबई संघात सामील झाला. परंतु २०१६ मध्ये त्याचा हंगाम खराब होता. यानंतर मुंबई इंडियन्सची मॅनेजमेंट हार्दिक पांड्याला संघातून काढून टाकू इच्छित होते.
जेव्हा तुम्ही अनकॅप्ड खेळाडू असता तेव्हा फ्रँचायझी तुम्हाला त्वरीत रिलीझ करते आणि नंतर रणजी ट्रॉफी किंवा इतर देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळाडू कशी कामगिरी करत आहे ते पाहते. तसेच, १० लाख रुपयांचा खेळाडू आहे, गरज पडल्याच पुढच्या सत्रात घेऊ. असा विचार फ्रेंचायझींचा असतो. मात्र रोहितने हे होऊ दिले नाही त्याने बुमराहसोबत पांड्यालाही वाचवले.
संबंधित बातम्या