Rohit Sharma Run Out : १४ महिन्यांनी आला आणि धावबाद झाला, रोहितने शुभमनला मैदानातच झाप झाप झापलं, पाहा-rohit sharma run out shubman gill rohit sharma run out for duck and shows anger on shubman gill video ind vs afg t20 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma Run Out : १४ महिन्यांनी आला आणि धावबाद झाला, रोहितने शुभमनला मैदानातच झाप झाप झापलं, पाहा

Rohit Sharma Run Out : १४ महिन्यांनी आला आणि धावबाद झाला, रोहितने शुभमनला मैदानातच झाप झाप झापलं, पाहा

Jan 11, 2024 10:45 PM IST

Rohit Sharma Run Out Video : रोहितचा राग कॅमेऱ्यात आणि स्टंप माइकमध्ये कैद झाला. ‘माझा कॉल होता, तू धावला का नाही’, असा आवाज स्टंप माइकमध्ये कैद झाला.

Rohit Sharma Run Out
Rohit Sharma Run Out

Rohit Sharma Run Out Shubman Gill : अफगाणिस्तानच्या पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्मा धावबाद झाला. शुभमन गिलच्या चुकीमुळे हिटमॅनला खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे, रोहित शर्मा १४ महिन्यानंतर टी-20 सामना खेळत होता.

मोहातील झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर अफगाणिस्तानने १५८ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या १५९ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा धावबाद झाला. 

भारतीय डावातील दुसऱ्याच चेंडूवर शॉट खेळल्यानंतर रोहित धाव घेण्यासाठी धावला. पण दुसऱ्या एंडला उभा असलेला शुभमन बॉलकडे पाहत होता. तो धावलाच नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी रोहितला धावबाद केले. धावबाद झाल्यानंतर रोहित गिलवर प्रचंड संतापलेला दिसला.

रोहितचा राग कॅमेऱ्यात आणि स्टंप माइकमध्ये कैद झाला. ‘माझा कॉल होता, तू धावला का नाही’, असा आवाज स्टंप माइकमध्ये कैद झाला. 

यानंतर रोहित खूप रागात डगआऊटमध्ये परतला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित धावबाद होण्याची ही सहावी वेळ होती.

यानंतर शुभमन गिलने काही चांगले फटके मारले, पण धावा करण्याच्या प्रयत्नात तोही चौथ्या षटकात १२ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला.

भारताने सामना सहज जिकला

दरम्यान, या मोहाली सामन्याचा हिरो शिवम दुबे ठरला, त्याने ३८ चेंडूत अर्धशतक केले. शिवमने या सामन्यात ४० चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय जितेश शर्माने ३१, तिलक वर्माने २६ आणि शुभमन गिलने २३ धावा केल्या.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने २९ धावा केल्या. 

या दोन फलंदाजांशिवाय गुरबाजने २३ आणि कर्णधार झाद्रानने २९ धावा केल्या. नजीबुल्लाह झादरानने अखेरीस ११ चेंडूत १९ धावांची इनिंग खेळली.

भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी २-२ विकेट घेतल्या. शिवम दुबेने एक विकेट मिळविला.

Whats_app_banner