Rohit Sharma set to Retire : टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT 2024-25) नंतर निवृत्ती घेणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, रोहित चालू मालिकेनंतर त्याच्या करिअरबाबत मोठा निर्णय घेणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे टीम इंडिया ही मालिका गेली चार वेळा जिंकत आहे. त्याचवेळी त्याची वैयक्तिक कामगिरीही खूपच घसरली आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील ५ डावात केवळ ३१ धावा केल्या आहेत.
एका वृत्तपत्राच्या माहितनीनुसार, बीसीसीआयचे उच्च अधिकारी आणि निवडकर्ते आधीच रोहितशी बोलले आहेत आणि असे दिसते की 'हिटमॅन' आपला निर्णय बदलणार नाही. निवृत्तीची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र माहितीनुसार, रोहित सिडनी कसोटीनंतर कसोटी कारकिर्दीचा शेवट करू शकतो.
जर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला, तर रोहित आणखी काही काळ कर्णधारपदी राहण्यासाठी निवडकर्त्यांशी बोलू शकतो.
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते की, या पराभवामुळे आपण निश्चितच दुखावलो आहोत.
टीम इंडियात एकीकडे जसप्रीत बुमराह आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एकट्याने ३० विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा आहे, ज्याने केवळ ३१ धावा केल्या आहेत.
मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव झाला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या पराभवावर रोहित शर्मा म्हणाला की, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्याच्या मनाप्रमाणे होत नाहीत. हा पराभव मानसिकदृष्ट्या धक्कादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.