Ranji Trophy : विराट-रोहित रणजी ट्रॉफीत खेळणार; सामन्याची तारीख आणि विरोधी संघ ठरला, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : विराट-रोहित रणजी ट्रॉफीत खेळणार; सामन्याची तारीख आणि विरोधी संघ ठरला, पाहा

Ranji Trophy : विराट-रोहित रणजी ट्रॉफीत खेळणार; सामन्याची तारीख आणि विरोधी संघ ठरला, पाहा

Jan 21, 2025 11:09 AM IST

Rohit Shamra Virat Kohli Ranji Trophy : अनेक वर्षांनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली रणजी ट्रॉफीत खेळणार आहेत.

Ranji Trophy : विराट आणि रोहित रणजी ट्रॉफीत खेळणार; तारीख आणि विरोधी संघ ठरला, पाहा
Ranji Trophy : विराट आणि रोहित रणजी ट्रॉफीत खेळणार; तारीख आणि विरोधी संघ ठरला, पाहा (AP)

Rohit Shamra Virat Kohli News : रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा पुढील टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. आतापर्यंत ऋषभ पंत, शुभमन गिल यांच्यासह अनेक खेळाडूंनी त्यांच्या रणजी ट्रॉफी पुनरागमनाची घोषणा केली आहे. 

दरम्यान, आता भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, तोदेखील रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी खेळणार आहे.

रोहितने त्याचा शेवटचा रणजी सामना २०१५ मध्ये खेळला होता आणि आता तो १० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुनरागमन करणार आहे.

रोहित शर्मा १० वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे, यासोबतच तो गेल्या १७ वर्षात रणजी सामना खेळणारा पहिला भारतीय कर्णधार बनणार आहे. एक विशेष बाब म्हणजे रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळणार आहे.

मुंबईचा पुढील सामना २३ जानेवारीपासून जम्मू-काश्मीरशी होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यासाठी १७ सदस्यीय संघ जाहीर केली आहे. यात रोहित शर्माचा समावेश आहे. 

जर आपण रोहित शर्माच्या रणजी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत ४२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ७२ च्या उत्कृष्ट सरासरीने ३८९२ धावा आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात त्याने १४ शतकी खेळीही खेळली आहेत.

विराट कोहली रणजी ट्रॉफीत खेळणार

विराट कोहलीदेखील १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे. ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यात तो खेळणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, कोहलीने रणजी ट्रॉफीसाठी स्वत:ला उपलब्ध करून दिले आहे, मात्र तो २३ जानेवारीपासून सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही.

त्याने मानदुखीचे कारण देत सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. आता दिल्ली संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने रेल्वेविरुद्धच्या सामन्यावर मोठे वक्तव्य केले आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग म्हणाले, "विराट कोहलीने डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली आणि संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधला आहे आणि सांगितले की तो रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

कोहलीने रणजी ट्रॉफीचा शेवटचा सामना २०१२ मध्ये खेळला होता. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने १४ धावा आणि ४३ धावांची खेळी खेळली. बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही कठोर नियम बनवले आहेत, त्यापैकी एका अंतर्गत सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या