Rohit Sharma Rahul Dravid New York Rain Video : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. टीम इंडिया २०२४ च्या T20 विश्वचषकाची तयारी करत आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना १ जून रोजी होणार आहे.
पण या दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. राहुल द्रविड आणि रोहित शर्माचा हा व्हिडीओ आहे. वास्तविक, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड न्यूयॉर्कच्या पावसात अडकल्यानंतर त्यांची तारांबळ उडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
खरंतर रोहित आणि राहुल द्रविड हे न्यूयॉर्क येथील एका हॉटेलमध्ये बसले होते. यादरम्यान पावसाला सुरुवात झाली. दोघांनाही कुठेतरी जायचं होतं. मात्र हॉटेलच्या दरवाज्यापासून थोड्याच अंतरावर गाडी उभी होती. पाऊस सुरू झाल्यानंतर रोहित आणि राहुल पटकन गाडीत बसण्यासाठी धावताना दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ X वर खूप शेअर झाला आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारताने अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वालला सलामीची संधी मिळू शकते. प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा हे देखील संघात आहेत. बीसीसीआयने ऋषभ पंत आणि संजू सॅमसनचाही संघात समावेश केला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग हे देखील संघात आहेत.
टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध आहे. हा सामना ५ जून रोजी होणार आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. १२ जून रोजी टीम इंडिया आणि युएस यांच्यात सामना होणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना कॅनडाविरुद्ध आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये होणार आहे.
टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.
राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.
संबंधित बातम्या