मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारताचे नियम वेगळे, इथले कायदे वेगळे… मैदानात घुसण्याआधी विचार करा, रोहित शर्माची चाहत्यांना विनंती

भारताचे नियम वेगळे, इथले कायदे वेगळे… मैदानात घुसण्याआधी विचार करा, रोहित शर्माची चाहत्यांना विनंती

Jun 04, 2024 11:16 PM IST

ind vs ire t20 world cup 2024 : भारत आणि आयर्लंड सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांना खास विनंती केली आहे.

rohit sharma press conference special request for fans
rohit sharma press conference special request for fans

rohit sharma press conference ind vs ire t20 world cup : भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज दिसत आहे. टीम इंडियाला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना ५ जून रोजी खेळवला जाईल. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन केले जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

भारताने या मैदानावर बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली होती, तर दुसरीकडे आयरिश संघही चांगलाच फॉर्मात असल्याचे दिसत आहे. त्यांनी अलीकडेच एका टी-२० सामन्यात पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाचा पराभव केला होता.

दरम्यान, भारत आणि आयर्लंड सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांना खास विनंती केली आहे.

रोहित शर्माची चाहत्यांना विनंती

टीम इंडियाचे जगभरात चाहते आहेत. भारतीय संघ जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळण्यासाठी गेला तरी चाहते त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. अमेरिकेतही असेच काही घडले आहे.

भारताचा सराव सामना पाहण्यासाठी अनेक चाहते स्टेडियममध्ये पोहोचले होते. या सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माला भेटण्यासाठी एक चाहता मैदानात पोहोचला होता. यानंतर अमेरिकन पोलिसांनी या चाहत्याला त्वरीत पकडले. पोलिसांनी त्या फॅनला जमिनीवर पाडले आणि हातकडी लावली

एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला किंवा दहशतवाद्याला जसे, पकडतात अगदी त्याचप्रमाणे अमेरिकन पोलिसांनी क्या चाहत्याला पकडले होते.

या मुद्द्यावर बोलताना रोहित शर्माने म्हटले आहे की, कोणीही मैदानात येऊ नये. हे योग्य नाही. भारताचे नियम वेगळे, इथले कायदे वेगळे. आपण कायद्याचे पालन केले पाहिजे."

अमेरिकेतील क्रिकेटबाबात रोहित काय म्हणाला?

अमेरिकेत टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा खेळवली जात आहे. त्यामुळे अमेरिकेत क्रिकेटसारखा खेळ प्रसिद्ध होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, अमेरिकेत असे खेळायला मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. तुम्ही न्यूयॉर्कला आलात आणि १० मिनिटांत इमिग्रेशन पूर्ण केले हे चांगले आहे. स्थानिक लोक तुम्हाला शुभेच्छा देत आहेत.

विशेष म्हणजे, ऑलिम्पिक २०२८ चे आयोजन अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात होणार आहे. यामध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ऑलिम्पिकच्या ४ वर्षे आधी विश्वचषक आयोजित करणे हा योग्य निर्णय आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४