मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : लाईव्ह सामन्यात पंचांसोबत झालेल्या त्या राड्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच बोलला! म्हणाला…

Rohit Sharma : लाईव्ह सामन्यात पंचांसोबत झालेल्या त्या राड्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच बोलला! म्हणाला…

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 06, 2024 06:45 PM IST

Rohit Sharma Umpire Clash: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळलेल्या टी-२० मालिकेत रोहित शर्माने अंपायर वीरेंद्र शर्माशी बोलतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

Rohit Sharma
Rohit Sharma (ANI)

Rohit Sharma And Virendra Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचे खेळाडूंसोबत मस्ती करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल (Viral Video) झाले. जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात तो चक्क अंपायरशी मस्ती करताना दिसला. या व्हिडिओत रोहित शर्माच्या बॅटीला लागून चौकार गेलेला चेंडूला अंपायरने लेग बाय दिला. यानंतर रोहित शर्माने अंपायरला विचारले असता त्यांचे संभाषण स्टंप माइकमध्ये कैद झाले, ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओबाबत स्वत: रोहित शर्माने खुलासा केला.

अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने चौकार मारला. मात्र, या सामन्यातील अंपायर वीरेंद्र शर्माने लेग बायचा इशारा दिला. त्यानंतर रोहित शर्माला अंपायर म्हणाला की, अरे, वीरू बॅटला चेंडू लागला आहे, तू लेग बाय का दिला. पुढे रोहित म्हणाला की, आधीच या मालिकेतील दोन सामन्यात शून्यावर बाद झालो आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. बिलासपूरमधील एका कार्यक्रमात रोहित शर्माने या व्हिडिओवर भाष्य केले.

रोहित शर्मा म्हणाला की, "जेव्हा तुम्ही दोनदा शून्यावर आऊट होता, तेव्हा पहिली धाव काढणे किती महत्त्वाचे असते, हे आम्हाला माहीत आहे. माझ्या बॅटीला लागून चौकार गेला. पण अंपायरच्या लक्षात आले नाही आणि त्याने लेग बायचा इशारा दिला. मी सहसा असे करत नाही. फलंदाजी करताना स्कोअरबोर्डकडे जास्त लक्ष देत नाही. माझे लक्ष फलंदाजीवर असते, पण त्या सामन्यात मी स्कोअरबोर्डकडे लक्ष दिले. तेव्हा माझ्या नावासमोर शून्य धावच होती. त्यानंतर मी अंपायरला याबाबत विचारले.

WhatsApp channel