IPL 2025: आयपीएलच्या पुढील मोसमात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, असे मत भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने व्यक्त केले आहे. आयपीएल 2024 च्या सुरूवातीस रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते कारण पुनरागमन करणारा हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली होती.
गार्ड बदलल्यामुळे एमआयची ड्रेसिंग रूम विभाजित घर असल्याची चर्चा संपूर्ण हंगामात होती. आयसीसीच्या मेगा स्पर्धेत रोहित आता राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करेल तर पांड्या उपकर्णधार असेल. दरम्यान, रोहितसाठी आयपीएल २०२४ चा हंगाम चांगला ठरला नाही. त्याने ३२.०७ च्या सरासरीने आणि १५० च्या स्ट्राईक रेटने ४१७ धावा केल्या. ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
पाच वेळा विजेतेपद पटकावणारा हा संघ पुढील हंगामासाठी काही मोठे निर्णय घेईल आणि कदाचित इशान किशनला कायम ठेवू शकणार नाही, असे आकाश चोप्रा यांना वाटत आहे. मुंबईचा संघ ईशान किशनला रिलीज करेल. मुंबई 'राईट टू मॅच' कार्ड वापरू शकते, कारण १५.५ कोटी म्हणजे खूप जास्त पैसे आहेत. इशानला कायम ठेवले जाईल असे मला वाटत नाही,' असे चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.
पुढे आकाश चोप्रा म्हणाले की, “रोहित शर्माने त्याचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे आणि तो आयपीएलच्या पुढच्या हंगामात निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणार नाही. ही फक्त माझी समजूत आहे. मी चुकीचा असू शकतो, पण मला असे वाटते की, रोहित शर्मा पुढील मोसमाची सुरुवात करताना मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही.”
दरम्यान, रोहित शर्माही संघातील इतर खेळाडूंसोबत टी-२० विश्वचषकासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला. आयसीसीच्या मेगा स्पर्धेसाठी संघाने सराव सुरू केला आहे. न्यू यॉर्कच्या नवनिर्मित नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित ब्लॉकबस्टर सामना ९ जून रोजी होईल.
संबंधित बातम्या