कॅप्टन नाही आता फक्त खेळाडू… मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून रोहित शर्माचा पहिला व्हिडीओ आला समोर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  कॅप्टन नाही आता फक्त खेळाडू… मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून रोहित शर्माचा पहिला व्हिडीओ आला समोर

कॅप्टन नाही आता फक्त खेळाडू… मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून रोहित शर्माचा पहिला व्हिडीओ आला समोर

Updated Mar 19, 2024 08:10 PM IST

mumbai indians ipl 2024 : कर्णधारपदावरून हटल्यानंतर रोहित शर्मा सोमवारी (१८ मार्च) मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये सराव करताना दिसत आहे.

ipl 2024 rohit sharma कॅप्टन नाही आता फक्त खेळाडू…  मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून रोहित शर्माचा पहिला व्हिडीओ आला समोर
ipl 2024 rohit sharma कॅप्टन नाही आता फक्त खेळाडू… मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून रोहित शर्माचा पहिला व्हिडीओ आला समोर

ipl 2024 rohit sharma : आयपीएल २०२४ साठी झालेल्या मिनी ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यानंतर संघाने हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी दिली. या निर्णयानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकवर प्रचंड टीका केली. रोहितच्या चाहत्यांना हा निर्णय आवडला नाही.

दरम्यान आता टीम इंडियाचा कर्णधार एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे. सोबतच रोहितने आयपीएल २०२४ साठी सरावदेखील सुरू केला आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये सामील

कर्णधारपदावरून हटल्यानंतर रोहित शर्मा सोमवारी (१८ मार्च) मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये सराव करताना दिसत आहे.

यावेळी रोहित चांगल्या टचमध्ये दिसत होता, त्याने अनेक सुरेख फटके या सरावादरम्यन खेळले. नेटकऱ्यांना रोहित शर्माचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

रोहित शर्माने २०१३ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. आता ११ वर्षांनंतर तो एक खेळाडू म्हणून आयपीएल खेळताना दिसणार आहे.

रोहितमध्ये एकहाती सामने फिरवण्याची क्षमता

रोहित शर्मा नेहमीच स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. मुंबई इंडियन्ससाठी सलामी करताना त्याने अनेक सामने एकट्याच्या बळावर जिंकवले आहेत. रोहित पुल शॉट्स खूप चांगले खेळतो आणि लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.

रोहित शर्माची आयपीएल कारकीर्द

रोहित शर्मा २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये ३ शतकं झळकावली आहेत. आतापर्यंत त्याने २४३ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ६२११ धावा केल्या आहेत ज्यात ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १३०.०५ आहे. आयपीएलमध्ये तो डेक्कन चार्जर्सकडूनही खेळला आहे. डेक्कन चार्जर्सने आयपीएल २००९ मध्ये विजेतेपद पटकावले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या