मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहित शर्मासोबत हे चाललंय तरी काय? आता चक्क टीम इंडियाच्या टीम इंडियाच्या पोस्टरवरून गायब

रोहित शर्मासोबत हे चाललंय तरी काय? आता चक्क टीम इंडियाच्या टीम इंडियाच्या पोस्टरवरून गायब

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 13, 2024 10:01 PM IST

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने टीम इंडियाचे एक पोस्ट शेअर केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या पोस्टवरून गायब आहेत.

Rohit Sharma
Rohit Sharma (PTI)

rohit sharma missing from team india poster : टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. २५ जानेवारीपासून ही मालिका भारतीय भुमीवर सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लवकरच या मालिकेची तयारी सुरू करणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संघात जवळपास तेच खेळाडू आहेत जे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते.

पण अशातच आता, एक नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद एका पोस्टवरून निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सने टीम इंडियाचे एक पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टरवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सोबतच तीन खेळाडूंचे फोटो या पोस्टरवर छापण्यात आले आहेत. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचे फोटो या पोस्टरवर आहेत. हे पोस्टर पाहून मुंबई इंडियन्सचे चाहते आता संतापले आहेत. कारण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या पोस्टवरून गायब आहे.

चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली

मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व काही सुरळीत चालले नसल्याचे क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे. काही चाहत्यांनी या पोस्टरबाबत मीम्स शेअर करताना लिहिले की कुछ तो गडबड है दया…, तसेच चाहत्यांनी एमआय पेज अनफॉलो करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिकला कर्णधार बनवले

आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी एमआयने रोहितकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हिसकावून घेतले. एमआयने रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. या निर्णयावर चाहत्यांनीही आक्षेप घेतला होता.

WhatsApp channel