IPL 2024 : रोहित शर्मा किती दिवस मुंबई इंडियन्समध्ये राहणार? लवकरच होऊ शकतो मोठा निर्णय-rohit sharma might be leave mumbai indians after ipl 2024 hardik pandya delhi capitals ipl mega auction ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : रोहित शर्मा किती दिवस मुंबई इंडियन्समध्ये राहणार? लवकरच होऊ शकतो मोठा निर्णय

IPL 2024 : रोहित शर्मा किती दिवस मुंबई इंडियन्समध्ये राहणार? लवकरच होऊ शकतो मोठा निर्णय

Feb 19, 2024 03:29 PM IST

Rohit Sharma, IPL 2024 : हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यानंतर रोहित शर्माचे चाहतेही प्रचंड नाराज झाले होते. रोहित सध्या फक्त खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे.

Rohit Sharma Mumbai Indians
Rohit Sharma Mumbai Indians (PTI)

Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएलच्या आगामी मोसमानंतर म्हणजेच आयपीएल १७ नंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला राम राम करू शकतो. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल जेतेपद पटकावले आहे.

पण आयपीएल २०२४ साठी झालेल्या मिनी ऑक्शननंतर सर्वकाही बदलले आहे. कारण मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केले आणि थेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले. यानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्समध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. तशा प्रकारच्या अनेक बातम्याही समोर आल्या आहेत.

हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यानंतर रोहित शर्माचे चाहतेही प्रचंड नाराज झाले होते. रोहित सध्या फक्त खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे.  

दरम्यान, पुढील वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी  फ्रेचायझींना केवळ ४ खेळाडू रिटेन करण्याचा अधिकार असेल. म्हणजेच, अनेक दिग्गज खेळाडू पुढील वर्षी आयपीएलच्या बाजारात उतरतील.

रिटेन करता येऊ शकणाऱ्या खेळाडूंमध्ये ३ भारतीय तर एक परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्यासह जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन करू शकते. 

गेल्या वेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६ कोटींची मोठी किंमत देऊन रिटेन केले होते. पण आता मुंबई इंडियन्सने रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे.अशा परिस्थिती रोहित शर्मा लिलावात उतरू शकतो.

अलीकडेच मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनीही रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण संगितले होते. ते म्हणाले होते, की रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे त्याला कर्णधारपदाच्या दबावातून मुक्त करण्यात आले आहे'.  यावर रोहित शर्माची पत्नी रितिका हिला मार्क बाउचरचे हे विधान आवडले नाही आणि तिने इन्स्टाग्रामवर कमेंट करून याला प्रत्युत्तर दिले होते.

या सर्व परिस्थितीवरून हे स्पष्ट होत आहे, की रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सर्वकाही ठीक नाही आहे. विशेष म्हणजे याच वर्षी दिल्ली कॅपिटल्स रोहितला आपल्या संघात घेण्याचे प्रयत्न करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला अद्याप रिलीज केलेले नाही.