Rohit Sharma ODI Retirement Update : रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. यानंतर रोहित शर्माने आपण वनडे फॉरमॅटमध्ये खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, सध्या तरी या फॉरमॅटला अलविदा करण्याचा विचार नाही, असे त्याने म्हटले होते.
वास्तविक, यापूर्वी असे मानले जात होते की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा वनडे फॉरमॅटला अलविदा करेल. मात्र, निवृत्तीबाबतच्या सर्व चर्चा त्याने फेटाळून लावल्या.
आता प्रश्न असा आहे की, रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये किती दिवस खेळणार? अशातच, यासंबंधीची मोठी माहिती समोर येत आहे.
रोहित शर्मा सध्या ३८ वर्षांचा आहे. त्याच्या खराब फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आता भारतीय कर्णधाराने फिटनेस सुधारण्याचा मार्ग शोधला आहे. खरं तर, रोहित शर्मा फिटनेस सुधारण्यासाठी काम करेल. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर या मोहिमेत रोहित शर्माला साथ देतील.
अभिषेक नायरच्या मदतीने रोहित शर्मा त्याच्या फिटनेसला नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माची नजर एकदिवसीय विश्वचषक २०२७ वर असल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्मा या स्पर्धेत खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे.
रोहित शर्मा याने ६७ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त २७३ एकदिवसीय आणि १५९ टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्याने आयपीएलचे १५९ सामने खेळले आहेत. कसोटी फॉर्मेटमध्ये रोहित शर्माने ४०.५८ च्या सरासरीने ४३०२ धावा केल्या आहेत.
तर, एकदिवसीय फॉर्मेटमध्ये, रोहित शर्माने ९२.८१ च्या स्ट्राइक रेटने आणि ४८.७८ च्या सरासरीने १११६८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने T20 सामन्यांमध्ये भारतासाठी १४० च्या स्ट्राइक रेटने आणि ३१.३४ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या