इंडियन प्रीमियर लीग २०२४ आता अंतिम टप्प्यात आहे. या रोमांचक लीगनंतर २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक २०२४ चा थरार सुरू होणार आहे. या मेगा आयसीसी स्पर्धेची तयारी शिगेला पोहोचली आहे. सर्व संघांचे स्क्वॉड जाहीर करण्यात आले आहेत.
त्याच वेळी, BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील काही दिवसांपूर्वी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. रोहित शर्मा पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार असेल. हार्दिक पांड्याची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआयने नुकतीच भारताची नवीन जर्सीही लाँच केली होती. यावेळी भारताच्या जर्सीत गडद निळा आणि केशरी रंगाचा चांगला मिलाफ आहे. कॉलरवर तिरंग्याचा रंग वापरण्यात आला आहे.
यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विटरवर एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये नवीन जर्सी परिधान करून दिसत आहेत. याशिवाय भारताची सरावाची ट्रेनिंगची जर्सी आणि नवीन अप्परही त्या व्हिडिओमध्ये दिसत होते.
मात्र, या संपूर्ण व्हिडिओमध्ये फक्त कर्णधार रोहित दिसत होता. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही दिसला नाही.
दरम्यान, भारतीय संघाने आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकून आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा २०१३ मध्ये जिंकली होती. आता यावेळीही टीम इंडियाकडून ट्रॉफीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी-20 विश्वचषक-20 साठी भारताचे राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान
संबंधित बातम्या