Rohit Sharma Getting Trolled for PR : भारताने ऑस्ट्रेलियात झालेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी लाजिरवाण्या पद्धतीने गमावली. या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा ३-१ अशा पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माने या मालिकेतील ३ सामन्यांच्या ६ डावात ३१ धावांचे योगदान दिले.
सिडनी कसोटीत रोहित शर्मा खेळला नाही. त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने त्याने या कसोटीतून माघार घेतली. पण रोहित शर्माने बाहेर बसून मोठा पराक्रम केला आहे, ज्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत.
रोहितने चालू सामन्यादरम्यान स्टार स्पोर्टला एक मुलाखत दिली. चालू सामन्यात एखाद्या ब्रॉडकास्टरला अशी मुलाखत देणारा रोहित शर्मा हा पहिलाच कर्णधार असावा. त्याने या मुलाखतीत, संघाच्या हिताचा विचार करून आपण स्वताहून प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाल्याचे सांगितले. तसेच, त्याने या मुलाखतीत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पेन लॉपटॉप काग घेऊन बसणारे लोक आमचे भविष्य ठरवणार नसल्याचे रोहितने सांगितले. तसेच, मी दोन लेकरांचा बाप असून मला बरे वाईट सर्व कळते, मी आताच निवृत्त होणार नाही, असेही म्हटले.
मग या मुलाखतीनंतर, अनेक चाहत्यांनी आणि क्रिकेट तज्ञांनी ३७ वर्षीय रोहित शर्माचे कौतुक केले आणि त्याला "निःस्वार्थ क्रिकेटर" म्हटले ज्याने संघाचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन एक धाडसी पाऊल उचलले.
क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, विद्या बालन, फरहान अख्तर आणि वरुण धवन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रोहित शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केले आणि त्याचे "धाडसी सुपरस्टार" म्हणून वर्णन केले.
पण या सेलिब्रेटींच्य ट्वीटवरून सोशल मीडियवर चांगलाच गोंधळ माजला. खास करून विद्या बालनची इंस्टाग्राम स्टोरी चांगलीच चर्चेत आली. काही वेळाने अनेक चाहत्यांनी तिच्यावर एखाद्याच्या गलिच्छ पीआर गेममध्ये भाग घेतल्याचा आरोप केला. कारण विद्याने सुरुवातीला जो मजकूर पोस्ट केला होता. तो एखाद्या WhatsApp मेसेजचा स्क्रीनशॉट असल्याचे दिसत होते. ज्यामध्ये ट्वीटर पोस्टसारखे टेक्स्ट दिसत होते.
अशा स्थितीत रोहित शर्माने एक पीआर स्टंट केल्याचे बोलले जात आहे. यावरून रोहित शर्मालादेखील प्रचंड ट्रोल केले जात आहे.
विद्या बालनने तिच्या सोशल मीडिया हँडलद्वारे रोहित शर्माचे कौतुक करताना म्हटले होते, रोहित शर्मा, काय सुपरस्टार!! स्वता: थांबण्याचा निर्णय घेण्यासाठी धैर्य लागते… तुला अधिक बळ मिळो, रिस्पेक्ट!! @ImRo45."
विद्या बालनचे अशा आशयाचे हे ट्विट चांगलचे व्हायरल झाले आणि ते तिच्यासाठी अडचणीचे कारण बनले. कारण एका युझरने कमेंट केली की आधी तुम्ही रोहितला इन्स्टाग्रामवर फॉलो तरी करा, मॅडम. मग त्यांना समर्थन द्या."
म्हणजेच, ज्या सेलिब्रेटींनी रोहित शर्माच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते, ते रोहित शर्माला सोशल मीडियवर फॉलोदेखील करत नव्हते.
यानंतर काही सोशल मीडिया चाहत्यांनी आणखी खोलवर माहिती काढली आणि विद्या बालनचा एक व्हिडीओ शोधून काढला. ज्यात तिने फिल्मफेअरच्या मुलाखतीत म्हटले होते की ती जास्त क्रिकेट पाहत नाही, परंतु तिचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर आहे.
तसेच, समदीश भाटियाच्या दुसऱ्या व्हिडिओ मुलाखतीत,विद्याने सांगितले होते की ती स्वतःला एक स्पोर्टी व्यक्ती म्हणवत नाही, परंतु टेनिस हा एकमेव खेळ तिला पाहायला आवडतो.
दरम्यान, ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याने तिने रोहित शर्माबाबतची इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली. पण हे करण्यापूर्वीच सोशल मीडियावर विद्यासह रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सचदेह यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्टचा महापूर आला. चाहत्यांचे मते, विद्या बालनने एक पीआर मेसेज फॉरवर्ड केला आहे.
चाहते म्हणाले, रोहित शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणे हा सगळा प्रकार “PR” अंतर्गत केला जात आहे. रोहित शर्माच्या पीआर टीमने विद्याला पोस्ट करण्यासाठी हा मेसेज पाठवला होता असेही बोलले जात आहे. यानंतर विद्याने या मेसेजचा स्क्रीनशॉट काढला आणि तोच पोस्ट केला, त्यानंतर विद्या अडकली.
सोशल मीडिया यूजर्सनी विद्या बालनला त्रास देण्यास सुरुवात करताच तिने ही पोस्ट डिलीट केल्याचेही सांगितले जात आहे. काही लोकांनी असेही म्हटले की अभिनेत्रीने 'जाणूनबुजून पीआर मेसेज पोस्ट केला'. चाहते या पोस्टला ‘व्हॉट्सॲप फॉरवर्ड’ असेही म्हणत आहेत.
चाहत्यांनी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिलाही या प्रकरणी लक्ष्य केले. रितिका बंटी सजदेह याची चुलत बहीण आहे. बंटी सजदेद हा कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहे.
विशेष म्हणजे, रोहित आणि रितिकाची भेट एका जाहिरातीच्या सेटवरच झाली होती. या वादानंतर रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सला दिलेली मुलाखत हाही एक पीआर स्टंट होता, असे अनेकांचे मत आहे.
संबंधित बातम्या