भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियात असून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेत आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळला नाही, पण आता ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो संघाचा भाग असेल. दरम्यान या सामन्याआधी रोहितने त्याच्या एका चाहत्याची १० वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
रोहितच्या या चाहत्याला बऱ्याच दिवसांपासून हिटमॅनला भेटून त्याचा ऑटोग्राफ घ्यायचा होता आणि अखेर भारतीय कर्णधाराने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाने कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हनसोबत सराव सामना खेळला आणि त्यात विजय मिळवला. या सामन्यात रोहितने कर्णधारपद भूषवले, पण फलंदाजीत तो आपली चमक दाखवू शकला नाही. अवघ्या ३ धावा करून तो बाद झाला.
या सामन्यानंतर एक मजेशीर किस्सा घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बहुधा ऑस्ट्रेलियातीलच आहे. भारतातील काही चाहते तिथे उपस्थित आहेत. रोहित स्टेडियमच्या गॅलरीत त्याच्या चाहत्यांना भेटत आहे. तो लोकांना भेटून ऑटोग्राफ देत आहे.
पण तेवढ्यात त्याच्या मागून आवाज येतो, "रोहित भाई प्लीज १० वर्ष झाले यार" हे ऐकून रोहित हसतो आणि ऑटोग्राफ देऊन दुसऱ्या बाजूला जातो आणि त्या चाहत्याची दशकभराची प्रतीक्षा संपवतो. रोहित त्याला छोट्या बॅटवर ऑटोग्राफ देतो.
ॲडलेड येथे होणाऱ्या कसोटी सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे जो गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारताने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. त्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया ३६ रन्सवर ऑलआऊट झाली होती, जी टेस्टमधील एका इनिंगमधली सर्वात कमी धावसंख्या आहे.
यावेळीही याच मैदानावर डे नाईट कसोटी सामना असून पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुनरागमन करण्यासाठी आतुर आहे.
संबंधित बातम्या