मुंबई कसोटीत न्यूझीलंडने भारताचा २५ धावांनी पराभव केला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी खिशात घातली. टीम इंडियाच्या पराभवासह रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.
घरच्या मैदानावर कसोटी मालिका ३-० ने गमावणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
टीम इंडियाच्या कसोटी इतिहासात घरच्या मैदानावर मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला अद्याप घरच्या मैदानावर व्हाईटवॉशचा सामना करावा लागला नव्हता. तर हा विजय न्यूझीलंडसाठी ऐतिहासिक ठरला.
भारताला कसोटी मालिकेत ३-० ने पराभूत करणारा न्यूझीलंड चौथा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने ही कामगिरी केली आहे.
पराभवानंतर रोहितने आपली चूक मान्य केली. आम्ही चांगले क्रिकेट खेळू शकलो नाही, असे तो म्हणाला. रोहित म्हणाला, कसोटी मालिकेतील पराभव पचवणे सोपे नाही. आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही आणि मला ते मान्य आहे. ते आमच्यापेक्षा खूप चांगले खेळले. आमच्याकडूनही खूप चुका झाल्या.
न्यूझीलंडने कसोटी मालिकेतील पहिला सामना ८ विकेटने जिंकला. हा सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला. दुसरी कसोटी ११३ धावांनी जिंकली. हा सामना पुण्यात झाला. यानंतर मुंबईने ही कसोटी २५ धावांनी जिंकली. न्यूझीलंडने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात २३५ धावा आणि दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात २६३ धावा आणि दुसऱ्या डावात १२१ धावा केल्या.