रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या लज्जास्पद विक्रमाची बरोबरी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये असा लाजिरवाणा विक्रम करणारा रोहित शर्मा संयुक्तपणे तिसरा कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला सलग ४ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामने गमावले. यानंतर रोहितच्या कर्णधारपदाखाली ॲडलेडमध्ये चौथा पराभव झाला आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालीही टीम इंडियाला सलग ४ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
महेंद्रसिंग धोनी हा भारताचा एकमेव कर्णधार आहे ज्याने सलग दोन कसोटी सामने गमावले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ आणि २०१४ मध्ये हे घडले होते.
भारताचे माजी दिग्गज खेळाडू मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सलग ६कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. १९६७ मध्ये टीम इंडियाने ६ मॅच टू बॅक टू बॅक हारल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला १९९९ मध्ये सलग ५ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
४ बॅक टू बॅक मॅचमधील पराभवाच्या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मासोबतच दत्ता गायकवाड यांच्या नावाचाही समावेश आहे.
दरम्यान, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ टेस्ट मॅच खेळला नव्हता. या सामन्यात जसप्रीत बुमराहने कर्णधाराची भूमिका बजावली होती, ज्यात टीम इंडियाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. मात्र, रोहितच्या पुनरागमनानंतर टीम इंडिया विजयाच्या मार्गावरून दूर गेली.
संबंधित बातम्या