मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : शुभमनच्या चुकीमुळे रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, या नकोशा यादीत विराटचेही नाव

Rohit Sharma : शुभमनच्या चुकीमुळे रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, या नकोशा यादीत विराटचेही नाव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 11:09 AM IST

Rohit Sharma 32nd Time Out On Zero : अफगाणिस्तानच्या पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्मा धावबाद झाला. शुभमन गिलच्या चुकीमुळे हिटमॅनला खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे, रोहित शर्मा १४ महिन्यानंतर टी-20 सामना खेळत होता.

Rohit Sharma
Rohit Sharma (ANI)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव केला. मोहातील झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर अफगाणिस्तानने १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १७.३ षटकात लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्मा धावबाद झाला. शुभमन गिलच्या चुकीमुळे हिटमॅनला खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे, रोहित शर्मा १४ महिन्यानंतर टी-20 सामना खेळत होता.

भारतीय डावातील दुसऱ्याच चेंडूवर शॉट खेळल्यानंतर रोहित धाव घेण्यासाठी धावला. पण दुसऱ्या एंडला उभा असलेला शुभमन बॉलकडे पाहत होता. तो धावलाच नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी रोहितला धावबाद केले. धावबाद झाल्यानंतर रोहित गिलवर प्रचंड संतापलेला दिसला.

रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ३२व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. या बाबतीत तो सध्या विराट कोहलीच्या मागे आहे. विराट ३४ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. झहीर खान भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४० वेळा शून्यावर बाद झाला आहे. या बाबतीत रोहित शर्मा आता सातव्या तर विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.

भारताने सामना सहज जिकला

दरम्यान, या मोहाली सामन्याचा हिरो शिवम दुबे ठरला, त्याने ३८ चेंडूत अर्धशतक केले. शिवमने या सामन्यात ४० चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय जितेश शर्माने ३१, तिलक वर्माने २६ आणि शुभमन गिलने २३ धावा केल्या.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने २९ धावा केल्या.

या दोन फलंदाजांशिवाय गुरबाजने २३ आणि कर्णधार झाद्रानने २९ धावा केल्या. नजीबुल्लाह झादरानने अखेरीस ११ चेंडूत १९ धावांची इनिंग खेळली.

भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी २-२ विकेट घेतल्या. शिवम दुबेने एक विकेट मिळविला.

WhatsApp channel