Ind vs Aus : फक्त गंभीरचा निर्णय नव्हता! रोहित शर्माला संघातून कोणी काढलं? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus : फक्त गंभीरचा निर्णय नव्हता! रोहित शर्माला संघातून कोणी काढलं? जाणून घ्या

Ind vs Aus : फक्त गंभीरचा निर्णय नव्हता! रोहित शर्माला संघातून कोणी काढलं? जाणून घ्या

Jan 03, 2025 12:13 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले. रोहितच्या जागी बुमराह भारताची कमान सांभाळत आहे. रोहितला वगळण्याचा निर्णय फक्त गौतम गंभीरचा नव्हता तर हा निर्णय वरून घेण्यात आला आहे.

Ind vs Aus : फक्त गंभीरचा निर्णय नव्हता! रोहित शर्माला संघातून कोणी काढलं? जाणून घ्या
Ind vs Aus : फक्त गंभीरचा निर्णय नव्हता! रोहित शर्माला संघातून कोणी काढलं? जाणून घ्या (HT_PRINT)

Rohit Sharma IND vs AUS 5th Sydney Test : भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले आहे. रोहितच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराह सिडनीमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळत आहे.

रोहितला वगळल्यानंतर हेड कोच गौतम गंभीर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. गंभीरनेच रोहितला वगळले, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. पण हे सत्य नाही, उलट हिटमॅनला वगळण्याचा निर्णय वरून आला आहे.

रेव्ह स्पोर्ट्सच्या एका रिपोर्टनुसार, रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळण्याचा निर्णय केवळ गौतम गंभीर याचाच नाही, तर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर याचाही या निर्णयात सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. रोहितचे सतत फ्लॉप होणे त्यांच्यासाठी कठीण होत होते आणि मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीनंतर त्याला वगळण्याची मागणी जोर धरू लागली.

चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांचा सल्ला घेतल्यानंतर हिटमॅनला वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या सांगण्यात आले आहे. या निर्णयात उर्वरित निवड समिती सदस्यांनाही विश्वासात घेण्यात आले होते. 

सोबतच, या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे, की रोहित शर्माला सिडनी कसोटी खेळायची होती, परंतु गौतम गंभीरने शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये परत आणण्याचा निर्णय घेतला. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत गिलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते.

गेल्या दोन मालिकेत रोहित शर्मा सुपर फ्लॉप 

रोहित शर्माने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो वाईट रित्या फ्लॉप ठरला. हिटमॅनने तीन सामन्यांच्या ५ डावात फलंदाजी केली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १० होती. त्याने या मालिकेत केवळ ३१ धावा केल्या.  एवढेच नाही तर रोहित शर्मा याआधीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही अपयशी ठरला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या