टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियात ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित ऑस्ट्रेलियात उशिरा पोहोचला, त्याला पहिली कसोटी खेळता आली नाही.
दरम्यान, रोहित शर्माची मोठी मुलगी समायरा हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत समायरा शर्मा मुंबईतील तिच्या शाळेत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
वास्तविक, समायराच्या शाळेत (धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल) अॅन्युअल डे साजरा झाला. यामध्ये समायरा तिची आई रितिका सजदेहसोबत पोहोचली होती.
अॅन्युअल डे निमित्ताने समायराने डान्समध्ये भाग घेतला.याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तर तिची आई रितिका ही प्रेक्षकांमध्ये बसून टाळ्या वाजवत तिला चीअर करत होती.
१५ नोव्हेंबरला रितिका सजदेह आणि रोहित शर्मा दुसऱ्यांदा पालक झाले. यावेळी त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव अहान शर्मा ठेवण्यात आले आहे. या जोडप्याची मोठी मुलगी समायरा हिचा जन्म २०१८ मध्ये झाला होता. ती ३० डिसेंबरला ६ वर्षांची होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या कसोटीला बॉक्सिंग डे टेस्ट असेही म्हटले जाते. सध्या ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे.
३ कसोटी सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. पर्थमध्ये खेळली गेलेली कसोटी भारताने जिंकली होती तर ॲडलेडमधील पिंक बॉल टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. ब्रिस्बेनमध्ये खेळलेला सामना अनिर्णित राहिला.
संबंधित बातम्या