India Squad For 2025 Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. शनिवारी (१८ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहितने या स्पर्धेसाठी खास फॉर्म्युला तयार केला आहे.
संघाची घोषणा करण्याआधी आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात प्रदीर्घ बैठक झाली. त्यानंतर आगरकर आणि रोहित पत्रकार परिषद घेण्यासाठी आले. चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची प्रथम घोषणा करण्यात आली. तसेच इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
युवा फलंदाज शुभमन गिलला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मोहम्मद सिराज याला वगळून त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली आहे. याशिवाय मोहम्मद शमीचेही संघात पुनरागमन झाले आहे.
रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ७,४,४ चा फॉर्म्युला तयार केला आहे. हा फॉर्म्युला म्हणजे ७ फलंदाज, ४ अष्टपैलू आणि ४ गोलंदाज असा आहे. अशाप्रकारे रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ खेळाडूंची निवड केली आहे.
या पत्रकार परिषदेत संघाच्या घोषणेसोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीसाठी निवड झालेल्या टीम इंडियाच्या ७ फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे.
त्यानंतर रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे ४ अष्टपैलू खेळाडू आहेत.
तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव हे ४ गोलंदाज आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद बुमराह, जसप्रीत शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
संबंधित बातम्या