Rohit Sharma Complained Sunil Gavaskar : भारतीय क्रिकेटशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ही माहिती आहे. खरं तर, भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांची बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
क्रिकब्लॉगरच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने सुनील गावसकर यांच्याविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. गावसकर यांच्या टीकेमुळे रोहित नाराज झाल्याचे सांगण्यात आले आहे. बाह्य दबावाचाही आपल्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे.
बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रोहितने गावस्कर यांच्या नकारात्मक टिप्पणीबद्दल तक्रार केली.
या वृत्तात सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रोहित शर्मा याला असे वाटते, की सुनील गावसकर यांनी जशी टीका केली तशी टीका करण्याची गरज नव्हती. याच कारणामुळे हिटमॅनने बीसीसीआयकडे सुनील गावसकर यांची तक्रार केली आहे.
रोहित शर्माने त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे आस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळला नाही. दुसऱ्या कसोटीपासून तो संघात सामील झाला. त्याने रजा घेतल्यावरही बरीच टीका झाली होती. गावस्कर यांनी रोहितला खूप खडसावले होते.
यानंतर रोहित शर्मा दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत धावा करू शकला नाही, तेव्हा गावस्कर यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली.
रोहितवर टीका करताना सुनील गावसकर यांनी तर सिडनी आणि मेलबर्नमध्ये रोहितने धावा केल्या नाहीत तर त्याने कर्णधारपद सोडावे, असे म्हटले होते.
गावसकर यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील आपल्या लेखात लिहिले होते की, "कर्णधार रोहित शर्मा त्याच्या क्षमतेच्या बाहेर होता आणि त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याचे कर्णधारपद आणि संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
संबंधित बातम्या