मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत रोहित शर्मा-शुभमन गिलची शतकं, इंग्लंडचे गोलंदाज रडकुंडीला

IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत रोहित शर्मा-शुभमन गिलची शतकं, इंग्लंडचे गोलंदाज रडकुंडीला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 08, 2024 11:40 AM IST

Rohit Sharma Shubman Gill Century : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाचवी कसोटी खेळली जात आहे. आज (७ मार्च) सामन्याचा दुसरा दिवस आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २१८ धावांत सर्वबाद झाला होता.आता भारतीय संघ फलंदाजी करत आहे.

Rohit Sharma Century : धर्मशाला रोहित शर्मा-गिलची शतकं, इंग्लंडचे गोलंदाज रडकुंडीला
Rohit Sharma Century : धर्मशाला रोहित शर्मा-गिलची शतकं, इंग्लंडचे गोलंदाज रडकुंडीला

India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दमदार शतक झळकावले आहे. रोहितसोबत शुभमन गिलनेही टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आहे. या दोघांमध्ये १५० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. इंग्लंड क्रिकेट संघ सध्या पूर्णपणे बॅकफूटवर आहे.

दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या १ बाद २६४ धावा आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील १२वे शतक १५४ चेंडूत पूर्ण केले. रोहितनंतर शुभमन गिलनेही १३७ चेंडूत चौथे कसोटी शतक पूर्ण केले.

टीम इंडियासाठी रोहितसोबत यशस्वी जैस्वाल सलामीला आला होता. मात्र यशस्वी अर्धशतकी खेळीनंतर बाद झाला. यानंतर रोहित आणि शुभमन गिलने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी दमदार फलंदाजी करत शतके झळकावली.

 लंचपर्यंत रोहितने १६० चेंडूंचा सामना करत १०२ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत १३ चौकार आणि ३ षटकारांचाही समावेश आहे. टीम इंडियाने तर शुभमन गिलने १४१ चेंडूंचा सामना करताना १०० धावा केल्या होत्या. 

गिलच्या या खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. गिल आणि रोहितने इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच थकवले आहे. पहिल्या डावात २१८ धावा करत इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. यानंतर आता टीम इंडियाने मोठी आघाडी घेतली आहे.

रोहित शर्माचे इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील दुसरे शतक आहे. रोहितने राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने १३१ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने रांचीमध्ये अर्धशतक झळकावले होते. आता त्याने धर्मशालामध्ये शतक झळकावले आहे.

इंग्लंड २१८ धावात गारद

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला अवघ्या २१८ धावात गारद केले. इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने ७९ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. क्रॉलीशिवाय सर्व फलंदाज अपयशी ठरले. तर भारताकडून कुलदीप यादवने ५ बळी घेतले होते. याशिवाय रविचंद्रन अश्विनने ४ बळी घेतले.

WhatsApp channel