मी कधी रिटायर व्हायचं हे लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवणार का? रोहित शर्माची स्फोटक मुलाखत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मी कधी रिटायर व्हायचं हे लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवणार का? रोहित शर्माची स्फोटक मुलाखत

मी कधी रिटायर व्हायचं हे लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवणार का? रोहित शर्माची स्फोटक मुलाखत

Jan 04, 2025 09:02 AM IST

Rohit Sharma On Retirement : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्माने निवृत्तीबाबत मौन सोडले. लंच ब्रेकदरम्यान जतीन सप्रू आणि इरफान पठाण यांनी त्याची मुलाखत घेतली.

 मी कधी रिटायर व्हायचं हे लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवणार का? रोहित शर्माची स्फोटक मुलाखत
मी कधी रिटायर व्हायचं हे लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवणार का? रोहित शर्माची स्फोटक मुलाखत (ICC- X)

Rohit Sharma Break Silence On Retirement : सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी) रोहित शर्मा याने निवृत्तीबाबत मौन सोडले आहे. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या रोहितला सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीतून वगळण्यात आले, त्यानंतर आता हिटमॅन निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण आता रोहितने निवृत्तीबाबत खुलासा केला आहे.

सिडनी कसोटीदरम्यान बोलताना रोहितने निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे आपल्या बाजूने स्पष्ट केले आहे. तो सध्या निवृत्तीचा विचार करत नाहीये. म्हणजेच आपण निवृत्ती घेणार नसल्याचे हिटमॅनने स्पष्ट केले आहे. याशिवाय रोहितने पुनरागमनाचीही आशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की तो फॉर्ममध्ये परत येईल.

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर रोहित म्हणाला, "लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक मी निवृत्ती कधी घ्यायची आणि मी काय निर्णय घ्यायचा हे ठरवू शकत नाही."

सिडनी कसोटीतून वगळल्यानंतर समोर आलेल्या सर्व रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, निवडकर्त्यांनी रोहितला सांगितले आहे की तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा भाग असणार नाही. मात्र, रोहितने याच्या अगदी उलट विधान केले आहे. आता भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सिडनी कसोटीत बुमराह भारताचा कर्णधार

सिडनी कसोटीत रोहित शर्माला बाद केल्यानंतर उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली होती. या मालिकेतील ही दुसरी कसोटी आहे, ज्यात बुमराह भारताचे नेतृत्व करत आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतही बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसला होता. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नव्हता, त्यामुळे बुमराहला कमान देण्यात आली होती. बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळवला होता.

Whats_app_banner