India vs Australia Perth Test : टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला आहे. रोहित सध्या त्याच्या कुटुंबासोबत आहे. भारताला २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे.
मात्र रोहित ही कसोटी खेळणार नाही. एका रिपोर्टनुसार रोहित पर्थ कसोटीत खेळणार नाही. तो सध्या कुटुंबासोबतच राहणार आहे.
विराट कोहलीसह जवळपास सर्वच खेळाडू पर्थला पोहोचले आहेत. पण रोहित टीम इंडियासोबत गेला नाही. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार रोहित पर्थ कसोटीत खेळणार नाही. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रोहितशी चर्चा केली आहे. रोहित म्हणतो की, त्याला आणखी काही काळ कुटुंबासोबत राहायचे आहे. यामुळे तो पर्थ कसोटीत खेळणार नाही.
रोहित पर्थ कसोटीत खेळणार नाही. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत तो पुनरागमन करू शकतो. तो दुसऱ्या कसोटीसाठी थेट ॲडलेडला पोहोचेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्येच खेळवला जाणार आहे. हा सामना ६ डिसेंबरपासून होणार आहे. याआधी भारत अ संघाचा पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सामना आहे. ३० नोव्हेंबरपासून पहिल्या कसोटीनंतर हा सामना खेळवला जाईल.
खरंतर, रोहितची पत्नी रितिका हिने शुक्रवारी मुलाला जन्म दिला. रोहित दुसऱ्यांदा पिता झाला. याबाबत आधीच बातमी आली होती. मात्र रोहितने शनिवारी पोस्ट शेअर करून सर्वांना माहिती दिली.
या कारणास्तव तो अजूनही आपल्या कुटुंबासोबत आहे. भारतीय संघ पर्थ कसोटीसाठी तयारी करत आहे. यादरम्यान संघाला मोठा धक्का बसला. शुभमन गिल सरावादरम्यान जखमी झाला. २२ नोव्हेंबरपूर्वी तो तंदुरुस्त झाला नाही तर तो पर्थ कसोटीतून बाहेर होईल.