रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. T20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय खेळाडू खूपच भावूक झालेले दिसले. कारण भारताने १० वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडू मैदानवरच रडले. भारताचा चॅम्पियन बनल्यानंतर रोहितने काय केले हे जाणून घेतल्यावर तुमचा त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल. रोहितने विजयानंतर पीचवरची माती चाखली.
वास्तविक, ICC ने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित खेळपट्टीची माती चाखताना दिसत आहे. हा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी रोहितने हे केले.
रोहितच्या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. विशेष म्हणजे बार्बाडोसच्या मैदानावर रोहितने तिरंगा गाढला.
दरम्यान, रोहित आणि विराट आता T20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या दोन खेळाडूंचा हा क्षण अधिक संस्मरणीय ठरला. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजेतेपद पटकावले.
टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पंड्या रडताना दिसला. रोहितने या सामन्यातील शेवटचा सामना पंड्याकडे सोपवला होता. त्याने आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आणि भारताला विजयापर्यंत नेले. पांड्यासोबतच सूर्यकुमार यादवनेही टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने शानदार झेल घेतला. हा झेल भारताच्या विजयात महत्त्वाचा ठरला. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
संबंधित बातम्या