Rohit Virat Test Records at Brisbane : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला होता. पण दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेट्सने पराभव केला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन कसोटी सामने अद्याप शिल्लक आहेत.
आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जो १४ ते १८ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. पण याआधी ब्रिस्बेन क्रिकेट स्टेडियमवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा रेकॉर्ड कसा आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
कसोटी: विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील गाबा क्रिकेट मैदानावर आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. २०१४ मध्ये त्याने हा एकमेव कसोटी सामना खेळला होता. या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दोन डाव खेळले. ज्यामध्ये त्याने १० च्या सरासरीने २० धावा केल्या.
वनडे : विराट कोहलीने गाबा क्रिकेट मैदानावर ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ७७ च्या स्ट्राईक रेटने १४१ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-20 : विराट कोहलीचा गाब्बा क्रिकेट ग्राऊंडवरचा टी-20 रेकॉर्ड खूपच खराब आहे. कोहलीने या मैदानावर एकच टी-२० सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने ५० च्या स्ट्राईक रेटने फक्त ४ धावा केल्या आहेत.
कसोटी: रोहित शर्माने २०१४ आणि २०२१ मध्ये ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर दोन कसोटी सामने खेळले आहेत. या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४ डाव खेळले आहेत. ज्यामध्ये रोहित शर्माने २०.८ च्या सरासरीने ८३ धावा केल्या आहेत.
वनडे : रोहित शर्माने ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंडवर ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या ५ सामन्यात त्याने ८५ च्या स्ट्राईक रेटने १५५ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
टी-20: ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंडवर टी-20 मध्ये रोहित शर्माचे आकडेही खूपच खराब आहेत. रोहितने या मैदानावर फक्त एकच टी-२० सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने ८७.५ च्या स्ट्राईक रेटने फक्त ७ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या