टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे. श्रीलंका दौरा संपल्यापासून रोहित आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशातच आता रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. रोहित आणि रितिका यांच्या व्हिडिओसोबतच सोशल मीडियावर दावा केला जात आहे की त्यांच्या घरी एक गुड न्यूज येणार आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
वास्तविक, सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रोहित आणि रितिका एका फंक्शनमध्ये डान्स करताना दिसत आहेत. X वर व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बेबी हिटमॅन लवकरच येत आहे.
मात्र रोहित किंवा रितिका यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. X वर शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्सही आल्या आहेत.
विशेष म्हणजे, रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे. श्रीलंका दौऱ्यात त्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५८ धावांची शानदार खेळी केली. यानंतर दुसऱ्या वनडेत ६४ धावा झाल्या. त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिसऱ्या वनडेत रोहितने ३५ धावा केल्या होत्या. रोहितशिवाय भारताचा एकही फलंदाज या मालिकेत विशेष काही करू शकला नाही.
रोहित आणि विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाचे उर्वरित खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरतील. ही मालिका १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. याआधी दुलीप ट्रॉफीमध्येही भारतीय खेळाडू खेळणार आहेत.