Rohit and ritika celebrates samaira birthday : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. यामुळे कर्णधार रोहित शर्मावर प्रचंड टीकाही झाली.
आफ्रिका दौऱ्यावर रोहितसोबत त्याचे कुटुंबीयही आहेत. या दरम्यान, रोहित शर्माचा एक समोर आला आहे. यामध्ये तो त्याची मुलगी समायरा हिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. रोहितने समायराचा वाढदिवस खूप खास पद्धतीने साजरा केला.
वास्तविक, रितिकाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित, रितिका आणि समायरा दिसत आहेत. त्यांच्यासोबत इतर लोकही आहेत.
रोहित आणि रितिका यांनी त्यांची मुलगी समायरचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. ते लहान मुलांसाठी असलेल्या एका उद्यानात दिसत आहेत. समायरा टॉय ट्रेनमध्ये बसलेली दिसत आहे. रोहितने समायराला तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास सरप्राईज दिले आहे. इंस्टाग्रामवर या व्हिडीओला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तसेच लाखो चाहत्यांनी कमेंट करून समायरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
रोहित शर्मा आणि रितिका यांचे २०१५ मध्ये लग्न झाले. तर समायरा हिचा जन्म २०१८ मध्ये झाला. ती आता ५ वर्षांची आहे. रितिका अनेकदा समायरा आणि रोहितसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रितिकाला इंस्टाग्रामवर २.५ मिलियन लोक फॉलो करतात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात नव्या रणनीतीसह उतरणार आहे. गेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.