मराठी बातम्या  /  Cricket  /  Rohit Sharma 250th Odi Match As Well As 450th Match Ind Vs Sl Asia Cup Final 2023 Most Internation Matches For India

Rohit Sharma : रोहित शर्मा आज इतिहास रचणार, सचिन-धोनीच्या या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री करणार

Rohit Sharma
Rohit Sharma (ANI)
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Sep 17, 2023 01:09 PM IST

Rohit Sharma 250th odi match : भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

india vs sri lanka asia cup 2023 final : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि श्रीलंका संघ आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी मैदानात उतरताच एका खास यादीत सामील होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, श्रीलंकेविरुद्ध आशिया कप फायनल हा रोहित शर्माच्या कारकिर्दीतील २५० वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना असेल. याशिवाय रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा ४५० वा आंतरराष्ट्रीय सामना असेल.

या यादीत सचिन नंबर वन 

भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने भारतासाठी ५३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धोनीनंतर विराट कोहली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी ५०५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यानंतर राहुल द्रविडचा क्रमांक लागतो. राहुल द्रविडने भारतासाठी ५०४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

रोहित शर्माचे आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय करिअर

आता भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत भारताकडून ४४९ सामने खेळले आहेत. भारतीय कर्णधाराने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १७५६१ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माची सरासरी ४३.०४ आहे. याशिवाय रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४४ शतके झळकावली आहेत. 

तसेच हिटमॅनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये तीनवेळा द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ३ द्विशतके झळकावणारा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे. रोहित शर्माची वनडे फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या २६४ धावा आहे. वनडे इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

Asia cup मधील सर्व ताज्या घडामोडी Cricket News सह Asia Cup schedule आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा Asia Cup points table पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर