Rohit Sharma Most T20 International : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (१४ जानेवारी) खेळला जात आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, हा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरताच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वास्तविक, रोहित शर्मा १५० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे. रोहित शर्माशिवाय इतर कोणत्याही क्रिकेटपटूने असा पराक्रम केला नाही.
या यादीत आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग दुसऱ्या स्थानावर आहे. या आयरिश खेळाडूने आपल्या कारकिर्दीत एकूण १३४ आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.
रोहित शर्माच्या T-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्माने आतापर्यंत १४१ T-20 इनिंगमध्ये ३८५३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ४ शतके आली. भारतीय संघाला २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक खेळायचा आहे.
भारतीय संघ टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज भारतीय T-20 वर्ल्डकप खेळू शकतात. हे दोन्ही खेळाडू २०२२ टी-20 विश्वचषकातही खेळताना दिसले होते.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार