Team India : टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India : टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! वाचा

Team India : टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! वाचा

Nov 09, 2024 03:12 PM IST

Gautam Gambhir vs Rohit Sharma : भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक मुद्द्यांवर एकमत नाही. बीसीसीआयच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये यावर चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! BCCI च्या रिव्ह्यू मीटिंगनंतर धक्कादायक खुलासा
टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! BCCI च्या रिव्ह्यू मीटिंगनंतर धक्कादायक खुलासा (AP)

अलीकडेच भारताला न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंडने भारतीय भूमीवर कसोटी मालिका ३-० ने जिंकून इतिहास रचला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता बीसीसीआयने शुक्रवारी (८ नोव्हेंबर) एक आढावा बैठक घेतली.

बीसीसीआयच्या आढावा बैठकीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, बीसीसीआय सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी उपस्थित होते, मात्र या बैठकीनंतर काय झाले हा प्रश्न आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा अनेक मुद्द्यांवर एकमत नाहीत. तसेच, भारतीय थिंक टँक अनेक मुद्द्यांवर गौतम गंभीरशी एकमत नाही.

भारतीय संघात अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांच्या निवडीमध्ये गौतम गंभीरचे मोठे योगदान होते, असे मानले जाते, परंतु संघ व्यवस्थापनातील इतर लोक मुख्य प्रशिक्षकाच्या निर्णयावर खूश नव्हते. नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

त्याचवेळी बीसीसीआयच्या शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत भारताच्या पराभवाच्या कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'ही सहा तासांची मॅरेथॉन बैठक होती, जी अशा पराभवानंतर ठरली होती.

भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात आहे आणि संघ पुन्हा रुळावर येण्याची खात्री बीसीसीआयला करायची आहे. याविषयी थिंक टँक (गंभीर-रोहित-आगरकर) काय विचार करत आहेत हे मंडळाला जाणून घ्यायचे आहे. सध्या गौतम गंभीर भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीला हजेरी लावली.

Whats_app_banner