संजू सॅमसनच्या संघानं उडवला बलाढ्य मुंबईचा धुव्वा; फिल्डिंग, बॉलिंग आणि कॅप्टन्सीच्या बळावर जिंकला सामना
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  संजू सॅमसनच्या संघानं उडवला बलाढ्य मुंबईचा धुव्वा; फिल्डिंग, बॉलिंग आणि कॅप्टन्सीच्या बळावर जिंकला सामना

संजू सॅमसनच्या संघानं उडवला बलाढ्य मुंबईचा धुव्वा; फिल्डिंग, बॉलिंग आणि कॅप्टन्सीच्या बळावर जिंकला सामना

Nov 29, 2024 05:29 PM IST

Mumbai vs Kerala SMAT 2024 : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ग्रुप-E च्या सामन्यात केरळने प्रथम फलंदाजी केली आणि २३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला १९१ धावाच करता आल्या.

संजू सॅमसनच्या संघानं उडवला बलाढ्य मुंबईचा धुव्वा; फिल्डिंग, बॉलिंग आणि कॅप्टन्सीच्या बळावर जिंकला सामना
संजू सॅमसनच्या संघानं उडवला बलाढ्य मुंबईचा धुव्वा; फिल्डिंग, बॉलिंग आणि कॅप्टन्सीच्या बळावर जिंकला सामना

भारतात सध्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील आज (२९ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात केरळने बलाढ्य मुंबईचा धुव्वा उडवला. या स्पर्धेत मुंबईचा हा पहिला पराभव आहे, आणि त्यांचा विजयरथ तुलनेने दुबळा असलेल्या केरळ क्रिकेट संघाने थांबवला. केरळने आपल्या फिल्डिंग, गोलंदाजी आणि कॅप्टन्सीच्या बळावर विजय मिळवला.

तत्पूर्वी, केरळचा कर्णधार संजू सॅमसन अवघ्या ४ धावा करून बाद झाला, पण त्याच्या संघातील दोन फलंदाजांनी मुंबई संघाच्या गोलंदाजांचा असा समाचार घेतला की, त्यांची जबरदस्त धुलाई केली.

रोहन कुनुमल आणि सलमान निझार यांनी तुफानी फलंदाजी करत केरळला निर्धारित २० षटकात २३४ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ग्रुप-E च्या सामन्यात केरळने प्रथम फलंदाजी केली. त्याची सुरुवात चांगली झाली नाही. शार्दुल ठाकूरने कर्णधार संजू सॅमसनला ४ धावांवर बाद केले. यानंतर मोहम्मद अझरुद्दीनही १३ धावांवर बाद झाला. सचिन बेबी ७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला तर सलमान निझारने रोहन कुनुमलला चांगली साथ दिली.

दोघांनी २ बाद ४० वरून संघाला १८० धावांपर्यंत नेले. रोहन कुनुमल ४८ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८७ धावा करून बाद झाला, तर सलमान निझारचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ९९ धावा केल्या. तर मुंबईला २३५ धावांचे लक्ष्य मिळाले. मुंबईकडून मोहित अवस्थीने सर्वाधिक ४ बळी घेतले.

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली असली तरी त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यासाठी गेल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वी शॉने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २३ धावा केल्या, तर आंगक्रिश रघुवंशीने १६ धावांची खेळी केली.

कर्णधार श्रेयस अय्यर १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा करून बाद झाला.

अजिंक्य रहाणेने आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावा केल्या, तर हार्दिक तामोरेने २३ धावा केल्या. यानंतर झपाट्याने पडणाऱ्या विकेट्समुळे मुंबई संघाला ९ विकेट्सवर १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. निधिशने ४, विनोद कुमार आणि मिधुनने २-२ विकेट घेतल्या.

Whats_app_banner