रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीत सराव करण्याची परवानगी का दिली? रॉबिन उथप्पा भकडला, कारण काय?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीत सराव करण्याची परवानगी का दिली? रॉबिन उथप्पा भकडला, कारण काय?

रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीत सराव करण्याची परवानगी का दिली? रॉबिन उथप्पा भकडला, कारण काय?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 07, 2024 03:22 PM IST

Robin Uthappa on Rachin Ravindra: न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्रला सीएसकेच्या अकादमीत सराव करण्यास परवानगी दिल्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा चांगलाच भडकला आहे.

रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीत सराव करण्याची परवानगी का दिली? रॉबिन उथप्पा भकडला, कारण काय?
रचिन रवींद्रला सीएसकेच्या अकादमीत सराव करण्याची परवानगी का दिली? रॉबिन उथप्पा भकडला, कारण काय? (AFP)

Robin Uthappa News: भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने सचिन रविंद्रला सीएसके अकादमीत सराव करण्याची परवानगी दिल्याबद्दल नाराजी केली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रचिनने आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज अकादमीमध्ये सराव केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसामन्यापूर्वी रवींद्रने ग्रेटर नोएडा येथील सीएसके अकादमीला भेट दिली आणि भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तिथे सराव केला.

रचिन रवींद्रसाठी सीएसके अकादमीत सराव करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने १३४ धावांची दमदार खेळी केली आणि त्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने ३६ वर्षांत प्रथमच भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकला आणि या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रचिन रवींद्रला सामनावीर घोषित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना रवींद्रने सांगितले की, चेन्नईत केलेल्या तयारीमुळे त्याला फलंदाजीत कशी मदत झाली. अलीकडेच उथप्पाने सीएसकेच्या अकादमीत सराव करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर नाराजी होती आणि म्हटले.

रचिन रवींद्र येथे आला आणि त्याने सीएसके अकादमीत सराव केला. सीएसके एक सुंदर फ्रँचायझी आहे, जी नेहमीच आपल्या खेळाडूंची काळजी घेते. परंतु, एक सीमा आखावी लागेल जिथे आपल्या फ्रँचायझी खेळाडूंपेक्षा देशाचे हित अग्रस्थानी असेल. विशेषत: जेव्हा तो परदेशी खेळाडू आहे आणि आपल्या देशाविरुद्ध खेळण्यासाठी आला आहे.

रवींद्रने न्यूझीलंडकडून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ५१. २० च्या सरासरीने २५६ धावा केल्या. डावखुऱ्या फलंदाजाचे आई-वडील दीपा आणि रवी कृष्णमूर्ती बेंगळुरूचे आहेत. त्याचे आजी-आजोबा आजही याच भारतात राहतात.

Whats_app_banner