Robin Uthappa : मी नेहमी आत्महत्येचा विचार करायचो... वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा डोकं चक्रावणारा खुलासा-robin uthappa on depression robin uthappa opens up on battle with depression after graham thorpe suicide case ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Robin Uthappa : मी नेहमी आत्महत्येचा विचार करायचो... वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा डोकं चक्रावणारा खुलासा

Robin Uthappa : मी नेहमी आत्महत्येचा विचार करायचो... वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा डोकं चक्रावणारा खुलासा

Aug 21, 2024 10:33 AM IST

रॉबिन उथप्पा भारताच्या २००७ टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. नैराश्याबद्दल बोलताना त्याने आपण एकदा कसे डिप्रेशनमध्ये गेलो होतो हे सांगितले.

Robin Uthappa : मी नेहमी आत्महत्येचा विचार करायचो... वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा डोकं चक्रावणारा खुलासा
Robin Uthappa : मी नेहमी आत्महत्येचा विचार करायचो... वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा डोकं चक्रावणारा खुलासा

टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू रॉबिन उथप्पा सध्या चर्चेत आला आहे. उथप्पाने त्याच्या आयुष्यातील वाईट काळाबाबस सांगितले आहे. रॉबिन उथप्पा २०११ मध्ये डिप्रेशनमध्ये गेला होता. याबाबत त्याने सविस्तर भाष्य केले आहे.

अलीकडेच इंग्लंडचा फलंदाज ग्रॅहम थॉर्पने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, निवृत्त फलंदाज हा नैराश्याने आणि चिंतेने ग्रस्त होता. थॉर्प याच्या पत्नी अमांडा यांनी सांगितले की, थॉर्प याच्यावर अनेक उपचार झाले, पण त्याच्या मानसिक आरोग्यात कोणताही बदल झाला नाही.

अशातच आता ३८ वर्षीय उथप्पा म्हणाला की, नैराश्यातून जाण्याने मानसिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते.

रॉबिन उथप्पा भारताच्या २००७ टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. नैराश्याबद्दल बोलताना त्याने आपण एकदा कसे डिप्रेशनमध्ये गेलो होतो हे सांगितले. या माजी भारतीय फलंदाजाने सांगितले की, त्याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक लढायांचा सामना केला, पण नैराश्यासारखी भयकंर कोणतीही समस्या नव्हती.

रॉबिन उथप्पा काय म्हणाला?

रॉबिन उथप्पाने सांगितले की, जेव्हा मानसिक आरोग्याशी तडजोड होते, तेव्हा बेडवरून उठणे आणि आरशात स्वतःकडे पाहणेही कठीण होते. त्यावेळी, उथप्पा त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात होता आणि तो २००७ टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा देखील एक भाग होता.

उथप्पाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, 'मी अलीकडेच ग्रॅहम थॉर्पबद्दल ऐकले आहे आणि आपण अनेक क्रिकेटपटूंबद्दल ऐकले आहे ज्यांनी नैराश्यामुळे आपले जीवन संपवले आहे.

याआधीही आपण खेळाडू आणि क्रिकेटपटूंबद्दल ऐकले आहे जे त्याच्याशी झगडत होते. आपण नालायक आहोत असे वाटते. आपणास असे वाटते की आपण आपल्या आवडत्या लोकांसाठी ओझे आहोत. तुम्हाला पूर्णपणे हताश वाटत असते. प्रत्येक पाऊल जड वाटते'.

रॉबिन उथप्पाने त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले आहे की, 'मी क्रिकेटच्या मैदानावर अनेक लढायांचा सामना केला आहे, परंतु नैराश्यासोबत लढल्यासारखी कोणतीही लढाई कठीण नव्हती. मी मानसिक आरोग्याविषयी मौन तोडत आहे कारण मला माहित आहे की मी एकटा नाही. तुमच्या कल्याणाला प्राधान्य द्या, मदत घ्या आणि नवीन आशा शोधा. मी #TrueLearnings च्या या एपिसोडमध्ये माझी कहाणी शेअर करत आहे.

मला आठवतंय २०११ मध्ये, मला माणूस म्हणून माझ्या अस्तित्वाची इतकी लाज वाटायची की मी स्वतःला आरशातही पाहू शकत नव्हतो. मी माझे संपूर्ण २०११ स्वतःला आरशात न पाहता घालवले. त्या क्षणांमध्ये मला किती हरवल्यासारखे वाटले. माझे अस्तित्व किती बोजड झाले होते ते मला माहीत आहे. मी आयुष्यात हेतुपूर्ण असण्यापासून किती दूर आहे हे मला माहीत आहे.

दरम्यान, मानसिक आरोग्याबाबत अनेक आव्हाने असूनही उथप्पाची कारकीर्द चांगली आहे. तो मुंबई इंडियन्स (MI), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), कोलकाता नाईट रायडर्स (KKR), पुणे वॉरियर्स, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांसारख्या IPL संघांसाठी खेळला. भारतीय क्रिकेट संघासाठी ९ वर्षांत ४६ एकदिवसीय आणि १३ टी-20 सामने खेळले आणि त्यानंतर २०२२ मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.