Virat Kohli Dropped Yuvraj Singh Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, विराट कोहलीने युवराज सिंगची कारकीर्द संपुष्टात आली आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.
कॅन्सरचे उपचार घेऊन परतल्यानंतर कर्णधार कोहलीने युवराज सिंगच्या फिटनेसला कोणतीही सवलत दिली नसल्याचे उथप्पाने सांगितले. पण आता व्हायरल होत असलेला युवराज सिंगचा जुना व्हिडिओ वेगळेच सत्य सांगताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ युवराज सिंगच्या सुमारे एक वर्ष जुन्या मुलाखतीचा आहे, ज्यामध्ये तो असे म्हणत आहे की विराट कोहलीने परतल्यानंतर त्याला बराच पाठिंबा दिला.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंह विराट कोहलीबद्दल म्हणाला होता, "मी जेव्हा पुनरागमन केले तेव्हा विराटने मला सपोर्ट केला होता. जर विराट कोहलीने मला सपोर्ट केला नसता तर माझे पुनरागमन कधीच झाले नसते."
पुढे युवराज सिंग धोनीबाबत म्हणाला, की “धोनीने मला २०१९ च्या विश्वचषकाबद्दल स्पष्ट चित्र दाखवले. त्याने सांगितले होते,की निवडकर्ते तुझा विचार करणार नाहीत. त्याने शक्य तितके केले."
ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत रॉबिन उथप्पाने विराट कोहलीवर अनेक प्रकारचे आरोप केले आहेत. कॅन्सरमधून पुनरागमन केल्यानंतर कोहलीने युवराज सिंगला कोणतीही सवलत दिली नाही, असे त्याने सांगितले होते.
युवीने क्षेत्ररक्षणात २ पॉइंटची सवलत मागितली होती, पण विराट कोहलीने तसे केले नाही. मग कसेबसे युवीने संघात स्थान मिळवले, परंतु केवळ एका मालिकेतील खराब कामगिरीनंतर युवराजला वगळण्यात आले, जे त्याच्या करिअरसाठी चांगले ठरले नाही.
संबंधित बातम्या