मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 मध्ये या ५ खेळाडूंची कामगिरी जबरदस्त, पण टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार नाही, पाहा

IPL 2024 मध्ये या ५ खेळाडूंची कामगिरी जबरदस्त, पण टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार नाही, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 19, 2024 03:41 PM IST

T20 World Cup 2024 : रियान पराग, अभिषेक शर्मा, मयंक यादव या युवा खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या खेळाने खूप धमाल केली आहे. त्यांच्या दमदार खेळामुळे त्यांच्यापैकी कोणातरी एकाचा टी-२० विश्वचषक संघात निश्चितच समावेश होईल, असे बोलले जात होते. मात्र, आता त्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे.

IPL 2024 मध्ये या ५ खेळाडूंची कामगिरी जबरदस्त, पण टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार नाही, पाहा
IPL 2024 मध्ये या ५ खेळाडूंची कामगिरी जबरदस्त, पण टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार नाही, पाहा

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये भारताचे अनकॅप्ड खेळाडू जबरदस्त कामगिरी आहेत. लीगमध्ये असे अनेक युवा खेळाडू आहेत जे आपापल्या संघासाठी भरपूर धावा करत आहेत आणि भरपूर विकेट घेत आहेत. पण, असे असूनही त्यांना आगामी टी-२० विश्वचषकात स्थान मिळविता येणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

रियान पराग, अभिषेक शर्मा, हर्षित राणा आणि मयंक यादव या युवा खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आतापर्यंत आपल्या खेळाने खूप धमाल केली आहे. त्यांच्या दमदार खेळामुळे त्यांच्यापैकी कोणातरी एकाचा टी-२० विश्वचषक संघात निश्चितच समावेश होईल, असे बोलले जात होते. मात्र, आता त्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. 

एका रिपोर्टनुसार, या युवा खेळाडूंची मेहनत व्यर्थ जाईल कारण सध्या संघात त्यांच्यासाठी जागा दिसत नाही. अशा परिस्थितीत या खेळाडूंना T20 विश्वचषकात स्थान का मिळणार नाही? हे जाणून घेऊया.

अभिषेक शर्मा

सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा आयपीएलच्या १७ व्या मोसमात चांगली कामगिरी करत आहे. अभिषेकने सनरायझर्सकडून ६ सामन्यात २११ धावा केल्या आहेत. अभिषेकने आपल्या संघासाठी सातत्याने वेगवान खेळी खेळल्या. तो टीम इंडियामध्ये पूर्णपणे फिट होऊ शकतो, पण सध्या त्याला संधी मिळणार नाही.

मयंक यादव

लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणाऱ्या मयंक यादवने आपल्या झंझावाती गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले आहे. तो १५५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. मयंक वेस्ट इंडिज आणि यूएसए मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत वेगवान खेळपट्ट्यांवर कहर करू शकला असता, परंतु तो भारतीय संघात स्थान मिळवू शकेल अशी आशा कमी आहे.

हर्षित राणा

केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणानेही आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. हर्षितने केकेआरकडून ५ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत. पण असे असूनही टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांची निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे.

रियान पराग

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या  रियान परागची बॅट यंदा आग ओकत आहे. विराट कोहलीनंतर तो धावा करण्याच्या बाबतीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. रियानने आपल्या संघासाठी ७ सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत रियान परागला टी-20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळू शकते, असे मानले जात होते.

वैभव अरोरा

केकेआरचा स्टार गोलंदाज वैभव अरोराही आपल्या गोलंदाजीने कमाल करत आहे. किफायतशीर गोलंदाजीसोबतच त्याची लाईन आणि लेन्थही अचूक राहते. वैभवने केकेआरसाठी ४ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत.

IPL_Entry_Point