भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका संपली आहे. या मालिकेत भारताने इंग्लंडचा ४-१ असा धुव्वा उडवला. भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेतील शेवटचा सामना (२ फेब्रुवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ८७ धावांवर गारद झाले. अशा प्रकारे टीम इंडियाने या सामन्यात १५० धावांनी मोठा विजय मिळवला. भारताकडून अभिषेक शर्माने ५४ चेंडूत १३५ धावांचा पाऊस पाडला. त्याने सर्व दिग्गजांचे चांगलेच मनोरंज केले.
या सामन्यात दोन्ही संघांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मोठी नावे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली होती. इंग्लंड संघाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे माजी पंतप्रधान वानखेडे स्टेडियमवर पोहोचले होते.
सामना सुरू होण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी मैदानात येऊन भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यांची भेट घेतली.
यानंतर भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही वानखेडेवर उपस्थित होते. यामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या नावांचा समावेश आहे.
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हेही वानखेडे स्टेडियमवर पोहोचले होते. अमिताभ यांच्यासोबत मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनही उपस्थित होता. अभिषेकने भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती. प्रत्येक शॉटवर दोघेही जल्लोष करत होते.
भारताचे दोन सर्वात यशस्वी उद्योगपती मुकेश अंबानी आणि नारायण मूर्ती देखील वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचले होते. ऋषी सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती यांच्या मुलीशी झाला आहे. राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले हेही स्टँडमध्ये उपस्थित होते.
मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांचा मुलगा आकाशही भारतीय संघाला चीअर करत होता. आकाशची पत्नी श्लोका आणि मुलगाही स्टेडियममध्ये होते. अभिषेक शर्माच्या शतकानंतर मुकेश अंबानी उभे राहिले आणि टाळ्या वाजवल्या.
संबंधित बातम्या