Rishabh Pant : पैसा देणार पण पॉवर नाही, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतकडून कर्णधारपद काढून घेणार! कारण काय? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rishabh Pant : पैसा देणार पण पॉवर नाही, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतकडून कर्णधारपद काढून घेणार! कारण काय? वाचा

Rishabh Pant : पैसा देणार पण पॉवर नाही, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतकडून कर्णधारपद काढून घेणार! कारण काय? वाचा

Published Oct 17, 2024 04:07 PM IST

Rishabh Pant IPL 2025 : पंत हा रिटेन्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सची पहिली पसंत असेल. पण मॅनेजमेंट त्याच्याकडे कर्णधारपद देणार नाही. कारण कर्णधारपद नसेल तर तो कोणत्याही दबावाशिवाय खेळू शकतो.

पैसा देणार पण पॉवर नाही, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतकडून कर्णधारपद काढून घेणार! कारण काय? वाचा
पैसा देणार पण पॉवर नाही, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतकडून कर्णधारपद काढून घेणार! कारण काय? वाचा (AFP)

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबाबत मोठी बातमी समोर येत आहे. एक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ऋषभ पंत आयपीएल २२०५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार नाही.

एका सुत्राच्या हवाल्यानुसार, या वृत्तपत्राने माहिती दिली आहे, की दिल्ली कॅपिटल्स नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आयपीएलचा नवा कर्णधार म्हणून पदभार स्वीकारू शकतो. किंवा फ्रँचायझी आयपीएल लिलावामध्ये नवा कर्णधार शोधू शकते.

दरम्यान, ऋषभ पंत हा रिटेन्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सची पहिली पसंत असेल. पण मॅनेजमेंट त्याच्याकडे कर्णधारपद देणार नाही. कारण कर्णधारपद नसेल तर तो कोणत्याही दबावाशिवाय खेळू शकतो.

दिल्ली कॅपिटल्स २०२१ नंतर प्लेऑफ गाठू शकली नाही

दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या वेळी २०२१ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला होता. त्यानंतर गेल्या ३ वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफसाठी पात्रता मिळवता आलेली नाही. तसेच, दिल्लीने १७ वर्षात फक्त एकदाच आयपीएल फायनल खेळली आहे. त्यावेळी २०२० मध्ये श्रेयस अय्यर त्यांच्या संघाचा कर्णधार होता आणि त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव स्विकारावा लागला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने एकमेव आयपीएल फायनल खेळली.

आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली सहाव्या स्थानावर 

आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर राहिली. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाने ७ विजय आणि ७ पराभवांसह सहाव्या स्थानावर आपला हंगाम संपवला.

ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द

२७ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आतापर्यंत खेळलेल्या १११ सामन्यांमध्ये १४८ च्या स्ट्राइक रेटने ३२८४ धावा केल्या आहेत. पंतने आतापर्यंत फक्त दिल्ली कॅपिटल्सचेच आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या