IND vs BAN : हेल्मेट आणि ग्लोव्हजची पूजा, शतकवीर ऋषभ पंतने चाहत्यांना भावूक केलं, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : हेल्मेट आणि ग्लोव्हजची पूजा, शतकवीर ऋषभ पंतने चाहत्यांना भावूक केलं, पाहा

IND vs BAN : हेल्मेट आणि ग्लोव्हजची पूजा, शतकवीर ऋषभ पंतने चाहत्यांना भावूक केलं, पाहा

Published Sep 21, 2024 09:30 PM IST

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शतक झळकावले. भारताची आघाडी ५०० धावांच्या पुढे नेण्यात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

IND vs BAN : हेल्मेट आणि ग्लोव्हजची पूजा, शतकवीर ऋषभ पंतने चाहत्यांना भावूक केलं, पाहा
IND vs BAN : हेल्मेट आणि ग्लोव्हजची पूजा, शतकवीर ऋषभ पंतने चाहत्यांना भावूक केलं, पाहा

ऋषभ पंतसाठी गेली दोन वर्षे खूप कठीण गेली. डिसेंबर २०२२ मध्ये एका कार अपघातात जखमी झाल्यानंतर त्याने २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात १०९ धावा करून त्याने टीम इंडियातील यष्टिरक्षक म्हणून आपला दावा मजबूत केला आहे. मात्र पंतच्या एका फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

हा फोटो तो दुसऱ्या डावात फलंदाजीला येण्यापूर्वीचा आहे. तिसऱ्या दिवशी (२१ सप्टेंबर) भारताने आपला डाव ३ विकेट गमावून ८१ धावांवरून पुढे वाढवला.

दुसऱ्या दिवसअखेर ऋषभ पंत आणि शुभमन गिल अनुक्रमे १२ आणि ३३ धावा करून नाबाद परतले होते. पण तिसऱ्या दिवशी फलंदाजी येण्यापूर्वी पंत त्याच्या क्रिकेट किटची पूजा करताना दिसला.

त्याने आपले हेल्मेट, हातमोजे आणि बॅट आणि इतर अनेक गोष्टी एका टेबलावर ठेवल्या होत्या. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तो या सर्व गोष्टींसमोर हात जोडून उभा आहे आणि चाहते त्याच्या अनोख्या स्टाइलवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शतक झळकावल्यानंतर पंतने डोळे मिटून आकाशाकडे पाहिले आणि या संस्मरणीय खेळीसाठी देवाचे आभार मानले. त्याचे शतक आणि शुभमन गिलसोबतच्या १६७ धावांच्या भागीदारीमुळे चौथ्या डावात बांगलादेशसमोर ५१५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवण्यात भारताला यश आले.

ऋषभ पंतने धोनीची बरोबरी केली

क्रिकेट किटची पूजा करून मैदानात उतरलेल्या ऋषभ पंतने नेहमीप्रमाणेच त्याचे शॉट्स खेळून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले.

भारताच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने १२४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचा डाव १०९ धावांवर संपला, ज्यामध्ये त्याने १३ चौकार आणि ४ षटकार मारले. पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक होते आणि आता त्याने कसोटी सामन्यात शतके झळकावण्याच्या बाबतीत धोनीची बरोबरी केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या