Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये कशावरून बिनसलं? समोर आली धक्कादायक माहिती
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये कशावरून बिनसलं? समोर आली धक्कादायक माहिती

Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये कशावरून बिनसलं? समोर आली धक्कादायक माहिती

Oct 25, 2024 10:59 AM IST

Rishabh Pant And Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सच्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये ऋषभ पंतचे नाव आहे. या खेळाडूने आपल्या फलंदाजीशिवाय विकेटकीपिंगमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये कशावरुन बिनसलं? समोर आली धक्कादायक माहिती
Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये कशावरुन बिनसलं? समोर आली धक्कादायक माहिती (PTI)

आयपीएल २०२५ पूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. पण यापूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांचा कर्णधार ऋषभ पंत याला रीलीज करणार असल्याचे बोलले जात आहे. पंत आयपीएल २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे, परंतु आता संघ त्याला सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे मालक आणि ऋषभ पंत यांच्यात लिलावापूर्वी रिटेन्शन किंमतीवर एकमत होऊ शकले नाही.

क्रिकबझच्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतसमोर एक रिटेन्शन किंमत ठेवली होती, पण पंत त्यावर खूश नाही. यामुळे पंत आणि संघ एकमेकांना सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांच्यातील ८ वर्षे जुनी भागीदारी संपुष्टात येईल, असे मानले जात आहे.

ऋषभ पंत-दिल्ली कॅपिटल्समध्ये रिटेन्शन रकमेवरून बिनसलं

या महिन्यात ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल आणि किरण कुमार यांची भेट घेतली. यानंतर, वृत्त समोर आले की दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत हा रिटेन करण्यासाठी देऊ करत असलेल्या रकमेवर खूश नाही. तसेच, ऋषभ पंतच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

नुकतीच ऋषभ पंतने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये यष्टीरक्षक फलंदाजाने लिहिले होते, की मी लिलावात गेलो तर किती किंमत मिळेल? ही पोस्ट ऋषभ पंतने १२ ऑक्टोबरला केली होती. तेव्हापासून सतत विविध चर्चा सुरू आहेत.

ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द

आकडेवारी दर्शवते की दिल्ली कॅपिटल्सच्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये ऋषभ पंतचे नाव आहे. या खेळाडूने आपल्या फलंदाजीशिवाय विकेटकीपिंगमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ऋषभ पंतने आतापर्यंत १११ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३५.३१ च्या सरासरीने आणि १४८.९३ च्या स्ट्राइक रेटने ३२८४ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत ऋषभ पंतने २९६ चौकार आणि १५४ षटकार मारले.

Whats_app_banner