बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा स्वत: पत्रकार परिषदेला आला. यावेळी त्याला अनेक अवघड प्रश्न विचारण्यात आले. रोहित शर्माच्या उत्तरात पराभवाची निराशा स्पष्टपणे दिसत होती.
यासोबतच त्याने टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या बेजबाबदार खेळाबद्दलही मत व्यक्त केले आणि स्पष्टपणे सांगितले की, पंतला आता गोष्टी समजून घेण्याची गरज आहे.
ऋषभ पंत बाबतच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, 'हे आजच घडले आहे, त्यामुळे आज त्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. साहजिकच आम्ही सामना हरलो, सर्वजण निराश झाले आहेत की कसे घडले ... परंतु असे असूनही, ऋषभ पंतला गोष्टी समजायला पाहिजेत की त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत. आपण बोलण्यापेक्षा आता या गोष्टी त्याला समजायला हव्या.
पंतने दोन्ही डावात बेजबाबदारपणे बाद झाला
रोहित शर्माने पत्रकार परिषदेत ऋषभ पंतसाठी जे काही सांगितले त्यावरून हे स्पष्ट होते की शॉट सिलेक्शनमध्ये त्याने केलेल्या चुकीमुळे कोणीही खुश नाही. भारतीय संघ व्यवस्थापनच नाही तर चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूही नाराज आहेत. पंतचा बेजबाबदार शॉट पाहून माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनीही त्याला मूर्ख म्हटले होते.
मेलबर्न कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ऋषभ पंतने चांगली सुरुवात केली, पहिल्या डावात पंतने २८ धावांचे योगदान दिले तर दुसऱ्या डावात तो ३० धावा करून बाद झाला. दोन्ही वेळा पंत खराब फटके खेळून बाद झाला.
संबंधित बातम्या