Rishabh Pant New Record: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने गुरुवारी राजस्थानविरुद्ध सामन्यात खास विक्रमाला गवसणी घातली. ऋषभ पंत हा दिल्लीसाठी १०० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पंतने २०१५ मध्ये दिल्लीकडून लीगमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०२२ मध्ये त्याची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे, कार अपघातानंतर तब्बल १४ महिन्यानंतर ऋषभ पंतने मैदानात पाऊल ठेवले. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ऋषभ पंतने पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
दिल्लीसाठी सर्वाधिक १०० सामने खेळणाऱ्या खेळाडूच्या यादीत ऋषभ पंत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अमित मिश्रा ९९ सामन्यांसह दुसऱ्या आणि श्रेयस अय्यर (८७ सामने) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (८२) आणि वीरेंद्र सेहवाग (७९) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
२)अमित मिश्रा - 99
३) श्रेयस अय्यर - 87
४) डेव्हिड वॉर्नर - 82*
५) वीरेंद्र सेहवाग - 79
दिल्लीसाठी १०० सामने खेळण्यासह ऋषभ पंतने विराट कोहली, गौतम गंभीर यांसारख्या खेळाडूच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. एका संघासाठी १०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऋषभ पंतचे नाव जोडले गेले आहे.
संबंधित बातम्या