आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात ऋषभ पंत याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना विकत घेतले. पंत आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की पंतला आयपीएलचे संपूर्ण २७ कोटी रुपये मिळणार नाहीत.
त्याच्या पगारातील मोठा हिस्सा कर म्हणून कापला जाईल. चला तर मग जाणून घेऊया की २७ कोटी रुपयांपैकी पंतांना टॅक्स कापल्यानंतर किती पगार मिळेल.
वृत्तानुसार, पंतला सरकारला कर म्हणून ८.१ कोटी रुपये द्यावे लागतील, त्यानंतर त्यांना २७ कोटी रुपयांपैकी केवळ १८.९ कोटी रुपये आयपीएल मानधन म्हणून मिळतील.
IPL २०२५ पूर्वी कोणताही खेळाडू दुखापत झाल्यास, संघ बदली म्हणून दुसऱ्या खेळाडूचा समावेश करू शकतो. त्याचवेळी, टीम इंडियाकडून खेळताना भारतीय खेळाडूला दुखापत झाल्यास, त्याला त्याचे पूर्ण वेतन मिळेल कारण बीसीसीआय भारतीय खेळाडूंना विमा प्रदान करते.
सध्या पंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. आता मालिकेतील दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून ॲडलेडच्या ओव्हलवर खेळवली जाणार आहे.
ऋषभ पंतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत १११ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ११० डावांमध्ये त्याने ३५.३१ च्या सरासरीने आणि १४८ च्या स्ट्राईक रेटने ३२८४ धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने १ शतक आणि १८ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये उच्च धावसंख्या १२८* धावा आहे.
पंतने २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो २०१६ ते २०२४ या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स या एकाच संघाकडून खेळला. आता पंत पहिल्यांदाच २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या माध्यमातून दुसऱ्या संघासाठी आयपीएल खेळताना दिसणार आहे.