IND vs NZ : जडेजाचा चेंडू ऋषभ पंतच्या सर्जरी झालेल्या गुडघ्यावर आदळला, वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ : जडेजाचा चेंडू ऋषभ पंतच्या सर्जरी झालेल्या गुडघ्यावर आदळला, वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला!

IND vs NZ : जडेजाचा चेंडू ऋषभ पंतच्या सर्जरी झालेल्या गुडघ्यावर आदळला, वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला!

Oct 17, 2024 06:10 PM IST

Rishabh Pant Injured, Ind vs Nz Test : पंतच्या याच उजव्या गुडघ्यावर सर्जरी झाली होती. २ वर्षांपूर्वी कार अपघातादरम्यान पंतच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली होती. दरम्यन ऋषभ पंत उद्या नक्कीच मैदानावर परतेल, अशी अपेक्षा आहे.

 IND vs NZ : जडेजाचा चेंडू ऋषभ पंतच्या सर्जरी झालेल्या गुडघ्यावर आदळला, वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला!
IND vs NZ : जडेजाचा चेंडू ऋषभ पंतच्या सर्जरी झालेल्या गुडघ्यावर आदळला, वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर गेला! (AP)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (१७ ऑक्टोबर) भारतासाठी अतिशय वाईट होता. सर्वप्रथम टीम इंडिया ४६ धावांवर ऑलआऊट झाली. यानंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा जखमी होऊन मैदानातून बाहेर पडला.

ऋषभ पंतच्या उजव्या पायाच्या दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. तो मैदानाबाहेर लंगडत जाताना दिसला. वास्तविक, ३६व्या षटकात डेव्हॉन कॉनवे फलंदाजी करत होता. तर रविंद्र जडेजा गोलंदाजीला होता. अशा स्थितीत जडेजाचा एक चेंडू कॉनेवला समजला नाही. त्याने या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तो बीट झाला आणि चेंडू थेट विकेटकीपर ऋषभ पंतच्या गुडग्यांवर जाऊन आदळला. यावेळी पंतला प्रचंड वेदना होत होत्या.

यानंतर ३७ वे षटक सुरू होण्यापूर्वी पंतने उजवा पॅड काढला आणि फिजिओ बोलावले, फिजिओंनी मैदानात येऊन पंतची अवस्था पाहिली. यानंतर फिजिओने सांगितले की पंत खेळू शकणार नाही. त्यानंतर ध्रुव जुरेल पॅड घालून मैदानात आला आणि विकेटकीपिंग केली.

विशेष म्हणजे, पंतच्या याच उजव्या गुडघ्यावर सर्जरी झाली होती. २ वर्षांपूर्वी कार अपघातादरम्यान पंतच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली होती. दरम्यन ऋषभ पंत उद्या नक्कीच मैदानावर परतेल, अशी अपेक्षा आहे.

पंतचं याच वर्षी कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन

ऋषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. डिसेंबरमध्ये पंत कुटुंबीयांना भेटण्यासाठी रुरकीला जात होता. त्यावेळी त्याची एसयूव्ही कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकली आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर अनेक महिने पंत क्रिकेटपासून दूर राहिला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले. त्याने १२४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पंतसोबत शुभमन गिलनेही त्याला साथ दिली. दोघांनी मिळून दीडशेहून अधिक धावांची भागीदारी केली. पंत १०९ धावा करून बाद झाला होता.

Whats_app_banner