ऋषभ पंतने या सामन्यात २६ चेंडूत २८ धावांची अतिशय संथ खेळी केली. यामुळे दिल्लीला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. ऋषभ पंत बाद झाल्यावर त्याचा संयम सुटला. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने रागाच्या भरात भिंतीवर बॅट आपटली. ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर स्वतःवर खूप नाराज दिसत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच, चाहते पंतच्या या कृतीबद्दल त्याला ट्रोल करत आहेत. ऋषभ फलंदाजी करताना चेंडू टोलवू शकला नाही, पण बाद झाल्यानंतर बॅट भिंतीवर आपटू शकतो, असे म्हणत सोशल मीडिया युजर्स पंतची खिल्ली उडवत आहेत.
वास्तविक, ऋषभ पंत युझवेंद्र चहलच्या चेंडूवर बाद झाला. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या १३.१ षटकात ४ बाद १०५ धावा होती. पॅव्हेलियनमध्ये परतताना ऋषभ पंत चांगलाच संतापलेला दिसत होता. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने रागाच्या भरात आपली बॅट भिंतीवर आपटली. आता पंतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा हंगामातील सलग दुसरा पराभव झाला आहे. यापूर्वी पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. त्याच वेळी, आता राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने २० षटकात ५ गडी गमावून १८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून १७३ धावाच करू शकला. दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ३४ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने २३ चेंडूत ४४ धावांची खेळी केली.